शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरिपासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या हेतूने जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून वनराई बंधाराची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत १० दिवसांत २ हजार ६०४ वनराई बंधारे बांधण्यात आले.जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी व बोरवेलसाठी मर्यादा आहेत. ठिबक सिंचनाचा लाभ पुरेशा प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.असा बांधता येतो वनराई बंधारा  १२ मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ७०० ते ८०० रिकामी पोती, घमेली, पावडा व प्रवाहाच्या आजूबाजूच्या मातीची गरज असते. बांधकाम करताना भरलेल्या मातीच्या पिशव्या दोरीने शिवून तयार कराव्यात. जागेची निवड करताना ओढ्याची रुंदी कमी असावी. 

बंधारा बांधण्यापूर्वी प्रवाहावरील दगड व गाळ काढून स्वच्छ करावा. बंधाऱ्याच्या खालील मोकळ्या जागेतून पाणी वाहू नये. ०.६० मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यात ०.३० मीटरचा गॅप ठेवावा. काही उंचीपर्यंत पोत्याचे तीन थर तयार करावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात आले आहे.-भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प