शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात पुन्हा नवे १८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल तालुक्यातील जानाळा येथील वधू पक्षातील दोन महिलेचा समावेश आहे. असे एकूण १८ बाधित रविवारी आढळून आले.

ठळक मुद्देआतापर्यंतची बाधित संख्या १८७ : चार दिवसात ५३ रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १८ बाधित पुढे आले आहेत. एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत १६९ असणारी बाधितांची संख्या वाढून आता १८७ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग जिल्ह्यात आता चांगलाच वाढत असून मागील केवळ चार दिवसात ५३ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.जिल्ह्यात सध्या उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६ आहे. तर सध्या उपचार सुरु असणाऱ्या बाधितांची संख्या ९१ आहे. त्यापैकी चार हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.दरम्यान, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे संपर्कातून व बाहेरून आलेल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व बाधितांची योग्य वैद्यकीय तपासणी सुरू असून सर्व संक्रमित वैद्यकीयदृष्टया स्थिर आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी. तसेच वैद्यकीय उपचाराला योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल तालुक्यातील जानाळा येथील वधू पक्षातील दोन महिलेचा समावेश आहे. असे एकूण १८ बाधित रविवारी आढळून आले.चंद्रपूर शहरात पुढे आलेल्या बाधितामध्ये आकाशवाणी चौकातील एका कॉम्प्लेक्समधील ४९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वी एमआयडीसीतील एका उद्योग समूहातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील हा गृहस्थ आहे. याशिवाय डब्ल्यूसीएल कॉलनी ऊर्जानगर परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, २० वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगा एकाच कुटुंबातील आहेत. ते यापूर्वीच्या ऊर्जानगरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर शहरातीलच हनुमान मंदिर परिसरातील २० वर्षीय उत्तर प्रदेशातून आलेला एक मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या मुलाचा १० तारखेला स्वॅब घेण्यात आला होता.याशिवाय पोलीस लाईनमधील चार जण पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहेत. अनुक्रमे २७, २३, २५ व ५९ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या तीन जवानाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह ठरले आहेत.ग्रामीण भागातही वाढले रुग्णचंद्रपूर ग्रामीणमधील दाताळा भागातील ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह म्हणून पुढे आली आहे. अमरावती शहरातून ही महिला परत आली होती. जानाळा येथील लग्नामध्ये सहभागी झालेल्या भद्रावती येथील आणखी चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नवरदेवाचे वडील असणारे ६१ वर्षीय गृहस्थ, लग्नातील २२ वर्षीय आचारी, नातेवाईक असणारे ४७ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय मूल तालुक्यातील जानाळा येथील २५ वर्षीय एक महिला पुन्हा पॉझिटिव्ह ठरली आहे. याच विवाह सोहळ्यातील नवरीकडील ती नातेवाईक होती. याच विवाह सोहळ्यातील बल्लारपुरातील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच वरोरा येथील श्रीनगर येथून आलेला एक पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील महिला पॉझिटिव्ह आली आहे. ती हैदराबाद येथून आली होती. जिल्ह्यातील कोरोनाबाधित १८७ झाले आहेत. आतापर्यत ९६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या