शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटातून काढला १६ किलोचा गोळा; चंद्रपूरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 07:55 IST

चंद्रपूर : सात वर्षांपासून पोटात १५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा मांस गोळा घेऊन आला दिवस पुढे ढकलणाऱ्या एका महिलेवर ...

चंद्रपूर : सात वर्षांपासून पोटात १५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा मांस गोळा घेऊन आला दिवस पुढे ढकलणाऱ्या एका महिलेवर चंद्रपूरमधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला पाच बाटल्या रक्त द्यावे लागले. सध्या प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

एका महिला रुग्णाचे पोट  वाढत होते. पण काही त्रास नसल्यामुळे कुटुंबाने विशेष लक्ष दिले नाही. तिचे पती पोलीस विभागातून निवृत्त झाले होते. मुले नोकरीवर.  मात्र, तिला दवाखान्याबद्दल  प्रचंड भीती! त्यामुळे दवाखान्यात  कसे न्यावे, हा प्रश्न कुटुंबाला छळत होता. दरम्यान, अचानक पोटात दुखायला लागल्यामुळे ती बेचैन झाली. रविवारचा दिवस होता. मानवटकर हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर सुरू होते. अचानक एक वयोवृद्ध स्त्री अपघात विभागात आली. त्यांची नाडी लागत नव्हती व रक्तदाब कमी होता. महिला सरळ झोपू शकत नव्हती. 

कुटुंबाने अखेर त्यांना मानवटकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करण्यास नकार दिला. सोनोग्राफी व सीटी स्कॅन केला. इतर रुग्णालयातून नकार मिळाल्याने तुमच्याकडे आलो, असे कुटुंबीयांनी सांगताच त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.

मानेत टाकली सेंट्रल लाइन

महिला रुग्ण बेचैन असल्याने सलाइन काढून फेकत होती. त्यामुळे डॉक्टरांनी मानेत सेंट्रल लाइन टाकली व त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आला. रक्त देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया सुरू केली. अडीच तासांनंतर मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्याचे वजन १५ किलो ९०० ग्रॅम भरले.

अंडकोषात मांसाचा गोळा दुर्मीळ बाब

मांसाचा गोळा अंडकोषापासून तयार झाला होता. पीळ भरल्यामुळे अतिशय वेदना होत होत्या. इतक्या मोठ्या गोळ्याला पीळ भरणे आणि अंडकोषात मांसाचा गोळा होणे ही दुर्मीळ बाब आहे, अशी माहिती डॉ. माधुरी मानवटकर व डॉ. शिल्पा टिपले यांनी दिली.