शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.

ठळक मुद्देपरवाना होणार रद्द : अतिरिक्त शुल्क आकारल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक शेककऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती केली असून सदर पथक जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून राहणार आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.खरीप हंगाम सुरू झाला असून खत तसेच बियाण्याची कृषी विभागाकडून काही महिन्यापूर्वीच मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसापासून विविध कंपन्याचे खत तसेच बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना वितरित केले जात आहे. शेतकºयांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कृषी केंद्रांना अचानक भेटी देऊन खत, बियाणे त्यासंबंधीची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी तसेच पाच विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार या पथकाला आहे. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये सध्या कपाशीची लागवड केली जात आहे. तर धान उत्पादक शेतकरीही शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे बोलल्या जात आहे.शेतकऱ्यांना करता येणार तक्रारपावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे घेण्यासाठी लगबस सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक त्यांची फसवणूक करतात. फसवणूक होत असेल तर शेतकºयांनी थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांना आपली फसगत झाल्याची तक्रार करता यावी यासाठी तालुकास्तरावर तकार निवारण केंद्राची स्थापनाही कृषी विभागाने केली आहे.एक आणि प्रत्येक तालुक्याक एक असे १६ पथक जिल्ह्यात राहणार असून शेतकºयांनी तक्रार केल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार असून कृषी केंद्राची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार सदर पथकांना देण्यात आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर काही कृषी केंद्र संचालक शेतकºयांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या केंद्रावर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथक कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शेतकºयांनी तक्रार करावी.-उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Farmerशेतकरी