शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

१५५ पाणी नमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:52 IST

पाणी ही सर्व सजीवांची आवश्यक गरज आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे, असे संबोधले जाते.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष परिमल डोहणे। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पाणी ही सर्व सजीवांची आवश्यक गरज आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे, असे संबोधले जाते. मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून मे महिन्यात तपासण्यात आलेल्या ५९३ पाण्याच्या नमून्यापैकी १५५ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे. मागील तपासणीपेक्षा या तपासणीत दूषित प्रमाण वाढले आहे. तर त्यातील काही पाणी नमुने हे शंभर टक्के दूषित आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. ही तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. मे महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ५९३ पाणीनमूने अनुजिव तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्या पाणी नमुन्यापैकी १५५ पाणी नमुने दूषित आढळून आले. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात होत आहे. यावेळी दूषित पाण्यामुळे विविधप्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ७१ गावातील नमुने दूषित प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत पाणीनमूने अनुजिव तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या नमुन्यापैकी ७१ गवातील नमुने दूषित आढळून आले आहे. त्यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत अन्तुरला, बेलसनी, म्हातारदेवी, ताडाळी केंद्रातंर्गत दाताळा, दुर्गापूर केंद्रातंर्गत दुर्गापूर, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर केंद्रातंर्गत विसापूर व भिवकुंड, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही केंद्रातंर्गत लोनवाही, चिमूर तालुक्यातील जांभुळघाट केंद्रातंर्गत सावरगाव, मालेवाडा, कारघाट, चीखलापार, पिंपळनेरी, खरकाडा, नेवगाव पेठ, मासळ केंद्रातंर्गत मानेमोहाळी, नंदारा, तुकुम, नेरी केंद्रातंर्गत गोंदाडा, गोरवत, सरडपार, कळमगाव, म्हसली, शंकरपूर केंद्रातंर्गत डोमा, चिंचाळा, जिवती तालुक्यातील पाटन केंद्रातंर्गत माराईपाटन, भारी, राजूरा तालुक्यातील चिंचोली केंद्रातंर्गत अंतरगाव, अन्नुर, अमृतगुडा, कोहपरा, पंचाळा, सातरी, चनाखा, भद्रावती तालुक्यातील माजरी केंद्रातंर्गत राळेगाव, थोराना, कुचना, पाटाळा, माजरी, देऊरवाडा, कुनाडाटोला, मुधोली केंद्रातंर्गत कोकेवाडा, किन्हाळा, मुधोली, कोंडेगाव, भामडेळी, सितारापेठ, खुटवंडा, रानतळोधी, घोसरी, विलोडा, टेकाडी, चंदनखेडा केंद्रातंर्गत पाचगाव, मासळ, बेलगाव, श्रीनगर, चंदनखेडा, मक्ता, चोरा, चरुर, वायगाव तु., ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान केंद्रातंर्गत उदापूर, गोंडपिपरी तालुक्यातील तेहगाव केंद्रातंर्गत परसोडी, वेजगाव, पारडी, सरांडी, वामनपल्ली, बेरडी, सिर्सी देऊळवार, कन्हाळगाव, पोंभुर्णा तालुक्यातील पोंभुर्णा केंद्रातंर्गत देवई या गावांचा समावेश आहे. अनेक गावांचे नमुनेच नाही दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दूषित पाण्याचे नमूने जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये पाठविले जातात. मात्र बहुतेक गावचे नमूने पाठविण्यात आले नाही. त्यामुळे येथील नमुन्याची तपासणी करण्यात आली नाही. तर चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी येथील दोन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आली. ते दोन्ही नमुने दूषित आढळली, तर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही केंद्रातंर्गत एक नमुना पाठविण्यात आला. तोसुद्धा नमुना दूषित आढळला.