शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

१५० स्कूल बसचे परवाने रद्द होणार

By admin | Updated: June 30, 2017 00:49 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा अपघात होऊ नये, यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी स्कूल बसची तपासणी करण्यात यावी,

२०० वाहनांची तपासणी : नोटीस बजावूनही दखल नाहीपरिमल डोहणे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा अपघात होऊ नये, यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी स्कूल बसची तपासणी करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देेश आहेत. मात्र जिल्ह्यातील ३५० पैकी केवळ २०० स्कूल बस वाहनांची तपासणी झाली आहे. उर्वरित १५० स्कूल बसच्या मालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केलेली नाही. त्यामुळे १५० स्कूलबसचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. नुकतचे नवे शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. या सत्रात विद्यार्थ्यांना सुखरुप शाळेत नेण्यासाठी व शाळेतून घरी आणण्यासाठी स्कूल बसचा वापर करण्यात येतो. त्यामुळे वाहतूक नियम लक्षात ठेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयातून स्कूल बस विशेष परवाने देण्यात येतात. त्यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. यावर विश्वास ठेऊन पालकवर्ग आपला पाल्य वेळेवर व सुरक्षीत शाळेत जावा, यासाठी पैसे खर्च करुन पाल्यांना स्कूलबसने शाळेत पाठवत असतो. मात्र शाळा सुरु होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला, तरी १५० स्कूल बस चालकांनी वाहनाची तपासणी केली नाही. जिल्ह्यात एकूण ३५० स्कूलबस आहेत. त्या सर्व स्कूल बसच्या मालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातून १७ एप्रिल रोजी वाहनाची तपासणी करण्यासंबंधीचे नोटीस देण्यात आले होते. त्यानुसार वाहनाची तपासणी करणे अनिवार्य होते. मात्र २७ जुनपर्यंत २०० स्कूलबस चालकांनी तपासणी केली. उर्वरीत १५० स्कूल बस चालका व मालकांनी अद्यापही वाहनाची तपासणी केली नाही. ज्या स्कूल बसच्या मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी केली नाही, अशांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नोटीस बजावण्यात आले आहेत. त्यानंतरही स्कूल बस वाहनाची तपासणी केली नाही तर स्कूलबसचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. स्कूल बसमध्ये या सुविधा हव्या स्कूलबस वाहनाचा रंग पिवळा असावा, स्कूल बसच्या मागे व पुढे स्कूलबस असे लिहलेले असावे, बसच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र भिंगाचे आरसे बसविले असावे, चालकाला बसच्या आतील भागातील सर्व दृष्य स्पष्ट दिसण्यासाठी मोठा आरसा असावा, स्कूलबसमध्ये प्रथमोचार पेटी असावी, अग्निशामक उपकरणे असावे, स्कूलबसमध्ये वेग नियंत्रक जोडले असावे, वाहनात ने-आण करणाऱ्या मुलांची यादी, निवसाचा पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमाक, रक्तगट, विद्यार्थ्याला उतरावयाचे ठिकाणी आदीची नोंद असलेली यादी असावी, स्कूलबसमध्ये बस चालकाव्यतिरीक्त एका सहवर्तीची तसेच ज्या स्कूल बसमध्ये मुलींची विद्यार्थिंनीची ने- आण करावी लागते अशा स्कूलबसमध्ये स्त्री सहवर्तीची नेमणूक असावी, वाहनचालकाला पाच वर्षे बस चालविण्याचा अनुभव तसेच स्कूल बस चालविण्याच्या सेवेत वैध असणारा बिल्ला असावा, तसेच आपत्कालीन परिस्थिीतीमध्ये सहजरित्या बाहेर पडण्याचे प्रशिक्षण वाहनचालक व त्याच्या सहवर्तीस दिलेले असावे या सुविधा असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची सुरिक्षत वाहतूक होण्याच्या दृष्टीने विनिमय नियम २०११ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नियमाचे पालन स्कूलबसच्या मालक व चालकांनी करणे गरजेचे आहे. पालकांनी सतर्कता बाळगावीआपला पाल्य सुरक्षित व वेळेवर शाळेत जावा, यासाठी पालकवर्ग पैसे खर्च करुन स्कूल बस लावतात. मात्र अनेक स्कूलमध्ये आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांचा अभाव आहे. अनेकदा स्कूल बसमध्ये विद्यार्थी कोंबून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालकांनी सतर्कता बाळगून ज्या स्कूल बसची तपासणी झाली तसेच आवश्यक सोई उपलब्ध आहेत, अशाच स्कूलबसमधून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे.विनातपासणी स्कूलबस चालविणे चुकीचे असून ही बाब कायद्याची अवहेलना करणारी आहे. रस्ते सुरक्षा निकषाचे पालण करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्कूल बसची तपासणी करावी. ज्या स्कूलबस मालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केली नाही, अशा स्कूलबसच्या मालकांना नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास त्याचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, याची नोंद घ्यावी.- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर