शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन विकासासाठी दीड कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:55 IST

जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) सीएसआर निधीतून दीड कोटींचा निधी देण्यात आला. अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : जेएनपीटीकडून सीएसआर निधी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) सीएसआर निधीतून दीड कोटींचा निधी देण्यात आला. अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.यावेळी जेएनपीटीचे व्यवस्थापक नीरज बन्सल, जे. के. ट्रस्टच्या डॉ. प्रिन्सी जॉन आणि डॉ. जयंता हाजारिका उपस्थित होते. जे. के ट्रस्टच्या वतीने चंद्रपूर येथे १५ एकात्मिक पशुधन विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. ही केंद्र मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर तालुक्यात स्थापन करण्यात येणार असून या केंद्रात काम करण्यासाठी स्थानिक स्तरावरून १ गोपाळ नियुक्त केला जाणार आहे. त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.१५ केंद्रांसाठी १५ सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. तर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंदाजे ८० गावातील शेतकºयांना लाभ मिळणार आहे. या केंद्रात नियुक्त केलेले गोपाळ शेतकºयांच्या घरी जाऊन पशुधन विकास विषयक सेवा पुरवतील. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या पशुधनामध्ये सुधारणा करून दूध उत्पादन वाढविणे, त्यातून शेतकºयाचे उत्पन्न वाढण्यास तसेच बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांचा असून वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जेएनपीटीने दीड कोटी रुपयांचा निधी सामाजिक दायित्व निधीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल नीरज बन्सल यांचे आभार मानले.शेतकऱ्यांना मिळणार पशुविषयक मार्गदर्शनपशुधन विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. जनावरांना विविध रोगाची लागण होत असते. मात्र सुविधांअभाी अनेकदा जनावरांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे गोपाळच घरी येवून माहिती देतील.