शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

१४२ कोटींची विकास कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:25 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४२ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी दिली आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला केंद्रीय मार्ग निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४२ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी दिली आहेत.भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या १९ जून २०१८ च्या पत्रान्वये सदर विकासकामांना मंजूरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ८० कोटी रूपये किंमतीचे कोसारा- सोईट - मोहुर्ली- चंद्रपूर-जुनोना-सातारा-पोंभूर्णा-नवेगाव मोरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, १२ कोटी रूपये किंमतीचे मूल-चामोर्शी रस्त्यावरील उमा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे, २५ कोटींचे बल्लारपूर तालुक्यातील मानोरा फाटा ते इटोली आणि इटोली-किन्ही-ऐनबोडी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच २५ कोटी रूपये किंमतीचे राजुरा तालुक्यातील राजुरा-चुनाळा-चनाखा-धानोरा-अन्नूर-अंतरगाव या रस्त्याची सुधारणा करणे या विकास कामांचा समावेश आहे. या महत्वपूर्ण विकासकामांसाठी १४२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.