लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील जांभुळघाट येथील शासकीय आश्रमशाळेतील १४ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने आदिवासी विकास व पालकांमध्ये खळबळ उडाली. यातील चार विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सुटी देण्यात आली, तर नऊ विद्यार्थिनी व एक विद्यार्थी असे एकूण १० जण रविवार (दि. १०) पासून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पद्वारा संचालित जांभुळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अचानक बिघडली होती. ४९ विद्यार्थी व ४५ विद्यार्थिनींवर जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्याने सर्वांना सुटी देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (१४) विद्यार्थ्यांना संडास, उलटी, मळमळ, चक्कर अशी लक्षणे सुरू जांभुळघाट झाली. यातील चार विद्यार्थ्यांना केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सोनाली धुर्वे, येथे उपचार शिवाणी चौधरी, शर्वरी दोडके, अंजली फरदे, बेदिका विलास चौधरी, स्नेहा नरेंद्र गायकवाड, चांदनी इंद्र शेडाम, ऋतुजा आशिब चौधरी, राजेश बालाजी राजनहिरे अशा नऊ विद्यार्थिनी व एक विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. माहिती मिळताच पालकांनीही आश्रमशाळेला भेट दिली.
शिक्षिकेने हिसकावला पत्रकारचा मोबाइल !काही माध्यमांचे प्रतिनिधी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात माहिती संकलनासाठी गेले असता विद्यार्थिनींसोबत असलेल्या शिक्षका संगीता मोडक यांनी एका पत्रकाराचा मोबाइल हिसकावला आणि तुम्ही इथे कसे आले. कुणी परवानगी दिली. तुमची पोलिसात तक्रार देते, या शब्दांत हुज्जत घातली. त्यामुळे पत्रकारांनी त्या शिक्षिकेचा निषेध नोंदविला आहे.
"जांभुळघाट आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात भरती झाले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. अहवाल यायचा आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती बरी आहे. मात्र, विद्यार्थी व्हायरल इन्फेक्शनने आजारी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे."-डॉ. अश्विन अगडे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, चिमूर
"आश्रमशाळेला भेट दिली. शाळेतील १४ विद्यार्थ्यांना ताप, मळमळ व उलटी झाली होती. यापैकी चार विद्यार्थी जांभुळघाट प्राथमिक केंद्रात उपचार घेऊन बरे झाले. डॉक्टरांनी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत."-प्रवीण लाटकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, चिमूर