शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

एसबीआयला 14 कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

चंद्रपूरातील स्टेट बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी ४४ कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज होते. कर्जप्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्ज वाटप करून बॅंकेची १४ लाख २५ हजार ६१ हजार ७०० रुपयांनी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार ८ मार्च २००३ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अधिक गृहकर्जासाठी कर्जदारांनी बॅंकेचे अधिकारी व एजंटसह हातमिळवणी केली. बनावट आयकर कागदपत्र सादर करीत स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चक्क १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ११ कर्जधारकर, एक एजंट व बॅंकेच्या ३ तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने तीनही बॅंक अधिकाऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. श्वेता महेश रामटेके (४२, रा. बाबूपेठ), वंदना विजयकुमार बोरकर (४०, रा. नगिनाबाग, चंद्रपूर), योजना शरद तिरणकर (४२, रा. दाताळा, चंद्रपूर), शालिनी मनीष रामटेके (४५, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीष बलदेव रामटेके (४७, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीषा विशाल बोरकर (रा. आंबेडकर वॉर्ड, भद्रावती), वृंदा कवडू आत्राम (४९, रा. वरोरा), राहुल विनय रॉय (३६, रा. माजरी), गजानन दिवाकर बंडावार (३९, रा. धाबा), राकेशकुमार रामकरण सिंग (४२, रा. सास्ती राजुरा), गीता गंगादिन जागेट (वय ५३, रा. घुग्घुस असे अटकेतील कर्जदारांचे तर एंजट गणेश देवराव नैताम (३६, रा. पोंभुर्णा ह. मु. कोसारा) व पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी (३९, रा. तुकूम, चंद्रपूर), विनोद केशवराव लाटेलवार (३८, ह. मु. हनुमाननगर तुकूम, चंद्रपूर, मूळ पत्ता वार्ड क्र. ४ सावली), देवीदास श्रीनिवासराव कुळकर्णी (५७, रा. मुकुंदनगर, अकोला मूळ पत्ता बादुले बुद्रूक, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी अटकेतील बॅंक अधिकाऱ्यांची नावे आहेत. आरोपींवर ४२०, ४०६, ४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भादंविचा गुन्हा दाखल केला. तपासात बनावट आयकर रिटर्न सादर केल्याचे समोर आले. त्यावरून ही अटकेची कारवाई  करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के करीत  आहेत. तपासात पुन्हा काही बडे मासे अडकण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे.

पुन्हा काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर या प्रकरणात तीन बॅंक अधिकाऱ्यांना अटक केली आहे. परंतु, पुन्हा बॅंकेचे अधिकारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच फरार कर्जधारक व एजंटना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले आहे. बॅंक अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी एक पथक मुंबई येथे रवाना झाले असल्याची माहिती आहे

अशी झाली फसवणूक

- चंद्रपूरातील स्टेट बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी ४४ कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज होते. कर्जप्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्ज वाटप करून बॅंकेची १४ लाख २५ हजार ६१ हजार ७०० रुपयांनी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार ८ मार्च २००३ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली. 

या संदर्भात सुमारे दीड वर्षापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांच्याकडे रितसर तक्रार केली होती. यानंतर चाैकशीला वेग आला. चाैकशीनंतर संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.- राजीव कक्कड, शहर अध्यक्ष, राकाॅ चंद्रपूर

 

टॅग्स :SBIएसबीआयfraudधोकेबाजी