शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, 'तो' केवळ १५ वर्ष वयाचा; पालकांना बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 17:36 IST

याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसमाजमन सुन्न करणारी घटना 

शंकरपूर (चंद्रपूर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात १३ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याची घटना घडली. ती गरोदर असल्याचे तिलाही स्वत:लाही माहिती नव्हते. पोट दुखत असल्याने आईने तिला दवाखान्यात नेले अन् धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

चिमूर तालुक्यातील एका गावात सातव्या वर्गात शिकणारी एक १३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती आहे. तर तिचा मित्र हा देखील अल्पवयीन, म्हणजे १५ वर्षांचा आहे. दोघांचे घर जवळच असल्याने या दोघांमध्ये प्रेमसंबंध व नंतर शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र, याची पुसटशी कल्पनाही त्या मुलीला आली नाही.

दरम्यान, सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. ज्या वयात आईची ममता कळत नाही त्या वयात ती आता आई बनणार आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

साेशल मीडिया नकाे रे बाबा!

आधुनिक काळात मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्युब अशा आधुनिक गोष्टी मुलांच्या हातात आल्या आहेत. मुले, मुुली नको त्या वयात नको त्या गोष्टी पाहायला लागले आहेत. साेशल मीडियाचाही अतिरेक हाेऊ लागला आहे. जिथे शिक्षणाची ओढ निर्माण व्हायला पाहिजे तिथे शारीरिक संबंधाकडे आकर्षण वाढू लागले आहे. यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थीदशेत असलेल्या पाल्यांना पालकांनी साेशल मीडियापासून दूर ठेवावे, अशा बाेलक्या प्रतिक्रिया यानिमित्ताने नागरिकांनी दिल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPregnancyप्रेग्नंसीchandrapur-acचंद्रपूर