शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

३० कोटी खर्च करून जिल्ह्यात १२ शाळा होणार हायटेक

By साईनाथ कुचनकार | Updated: May 13, 2024 17:57 IST

Chandrapur : १०१ वर्गखोल्यांसाठी २० कोटींचा निधी; खनिज विकास निधीतून होणार बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये या शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, आता जिल्ह्यातील १२ शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ३० कोटी १३ लक्ष रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सोबतच विविध गावांतील १०१ वर्गखोल्यांचेही बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी २० लाख ३५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या शाळांसाठी जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत निधी खर्च केला जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळणार आहे.

शाळांमध्ये दर्जेदार सुविधाजिल्ह्यातील शाळांमध्ये १०१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये २० लाख ३५ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत.

जटपुरा कन्या शाळेचा विसरचंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत जटपुरा गेट कन्या शाळा आहे. ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. मात्र सध्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जटपुरा गेट परिसरातील या शाळेचीही दुरुस्ती करून पुन्हा ही शाळा भरवावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे.

या शाळांचा आदर्श शाळा म्हणून होणार विकास आणि त्यांना देण्यात आलेला निधी 

जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, पेंढरी कोके - २ कोटी २९ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च जि. प. प्राथमिक शाळा , निमगाव -   २ कोटी ६५ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक. शाळा, चिखली - २ कोटी १४ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, देवाडा बु. - २ कोटी १४ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मानोरा -  २ कोटी २९ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मोरवा - १ कोटी ७४ लक्षजि.प. हायस्कूल विहीरगाव - ४ कोटी ४० लक्षजि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा - १ कोटी ९९ लक्षजि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा शेणगाव - ३ कोटी ४९ लक्षजि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मेंडकी - २ कोटी ७ लक्ष                                जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, नवताळा - २ कोटी १४ लक्षजि.प. हायस्कूल भद्रावती भद्रावती - २ कोटी ७४ लक्ष

वर्गखोल्यांचे १०१ होणार बांधकाम■ खनिज विकास निधीतून वीस कोटी ३५ हजार रुपये खर्च करून जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांतील विविध गावांतील १०१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील चार, चिमूरमधील सहा, कोरपना तालुक्यातील पाच, नागभीडमधील चार, पोंभुर्णा तालुक्यातील पाच, जिवतीमधील आठ, मूल पाच, सिंदेवाही चार, सावली पाच, बल्लारपूर तालुक्यातील सहा, गोंडपिपरी तीन, तर ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन गावांतील शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर