शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

११ लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

By admin | Updated: October 16, 2014 23:21 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६६.२६ एवढी आहे. ब्र्र्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक ७४.८७ टक्के

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६६.२६ एवढी आहे. ब्र्र्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक ७४.८७ टक्के मतदान झाले, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे ५४.०७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रयत्न केले. एवढेच नाही तर, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन केले होते. यानंतरही चंद्रपूरातील मतदारांची उदासिनता दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात १०७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवाराचे नशिब ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष १९ आॅक्टोबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे आहे.राजुरा ७०.८० टक्के, चंद्रपूर ५४.०७ टक्के, बल्लारपूर ६३.१८ टक्के, ब्रह्मपुरी ७४.८७ टक्के, चिमूर ७४.५५ टक्के व वरोरा ६४.८१ टक्के मतदान झाले. एकूण ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी विधानसभा मतदार संघासाठी मतदान केले. यात ६ लाख १५ हजार ७३० पुरुष तर, ५ लाख ४९ हजार ८७६ महिलांचा समावेश आहे. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६७.३७ टक्के तर महिलांची मतदानाची टक्केवारी ६५.०६ एवढी आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा ६७.३४, चंद्रपूर ५०.०४, बल्लारपूर ६१.१३, ब्रह्मपुरी ६६.९७, चिमूर ७१.७९ व वरोरा ६३.९६ असे एकूण ६३.५३ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजुरा ६८.८७, चंद्रपूर ५४.७९, बल्लारपूर ६१.३१, वरोरा ६२.७६, ब्रह्मपुरी ७१.१६ व चिमूर ७१.७७ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १९ आॅक्टोबरला होणार आहे. ७०-राजुरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा, ७१-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, ७२-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, ७३-ब्रह्मपुरी- शासकीय तंत्र निकेतन नागभीड रोड ब्रह्मपुरी, ७४-चिमूर राजीव गांधी भवन तहसील कार्यालय परिसर चिमूर व ७५-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.(नगर प्रतिनिधी)