जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६६० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३ हजार ४०१ झाली आहे. सध्या ८५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ३० हजार २७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख तीन हजार ४४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या १०४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६०, चंद्रपूर तालुका १०, बल्लारपूर नऊ, भद्रावती तीन, नागभिड तीन, मूल तीन, गोंडपिपरी एक, राजुरा तीन, चिमूर दोन, वरोरा चार, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
बूाॅक्स
त्रिसूत्रीचा वापर करा - जिल्हाधिकारी
कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
बाॅक्स
रुग्णांची चढउतार
४ मार्च ७०
५ मार्च १२३
६ मार्च १२०
७ मार्च ८६
८ मार्च ३८
९ मार्च ८२
१० मार्च ६३
११ मार्च ९६
१२ मार्च ७५