शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 10:48 IST

प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

दूर्गापूर(चंद्रपूर) : आजोबाच्या अंत्यसंसकारासाठी आलेल्या नातवाला घरामागून बिबट्याने उचलून नेत ठार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरलगतच्या नेरी येथे घडली. प्रतीक बावणे (वय सुमारे १०) असे मृतकाचे नाव आहे.

या परिसरात वाघ आणि बिबट्याने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या घटनेची ही पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नागरिकांची गर्दी होती. घरापासून काही अंतरावर प्रतीकचा मृतदेह आढळून आला. त्याचे धड आणि डोके वेगळे होते.

ऊर्जानगर नेरी येथील समता नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तेजराम मेश्राम यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी भद्रावती येथून नातू प्रतिक बावणे हा आपल्या आईसोबत आला होता. रात्री उशिर झाल्याने तेजराम मेश्राम यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. घरी मृतदेह असल्याने घरातील मंडळी घराच्या परिसरातच वावरत होती.

प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ही बाब काही जणांनी प्रत्यक्ष बघितली. यानंतर त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र, काही अंतरावर प्रतीकचा मृतदेहच आढळून आला. त्याचे धड आणि मुंडके वेगळे होते.

या घटनेने हळहळ व्यक्त होत असली तरी घटनेची वार्ता परिसरात पोहचताच नागरिक चांगलेच संतापले आहे. वारंवार होणाऱ्या घटनांवर वनविभागाने नियंत्रण मिळविले नाही. ऊर्जानगर परिसरात एका वाघाला जेरबंद केल्यानंतर ही घटना घडली आहे. याच भागात काहीच दिवसांपूर्वी बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला होता. या घटनेने नागरिकांमधील दहशत शांत होत नाही तोच ही घटना घडली.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर