शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:13 IST

दारूबंदी मूल, भद्रावती व सिंदेवाही तालुक्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दहा लाखांच्या दारूसह २० लाखांची मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्देविविध ठिकाणी कारवाई : २६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : दारूबंदी मूल, भद्रावती व सिंदेवाही तालुक्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दहा लाखांच्या दारूसह २० लाखांची मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवारी घडली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मूल : दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला माहित होताच येथील रेल्वे क्रासिंगजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, सिंदेवाही वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या दोन वाहनांची तपासणी करून ५ लाख ६० रुपयांची दारू जप्त केली. आशिष अशोक मुळे (२३) रा. खरबी ता. ब्रह्मपुरी, स्वप्नील शामदेव पाल (२१) रा. मांगली ता. नागभीड, विकेश जांभुळे (२३) रा. कन्हाळगाव ता. पवनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहे. आरोपींकडून दोन चारचाकी वाहन आणि चार भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतुक व विक्री होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एम.डी. कुमरे, हवालदार गुलाब बलकी, महेश पतरनगे, नरेंद्र अंडेलवार, प्रभाकर गेडाम आदींनी एम.एच.४० ए.आर. ०१९२ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करून दारू जप्त केली. पोलीस येत असल्याचे पाहून वाहनातील दोन आरोपी घटनास्थळावरून पळाले. वाहनचालक आशिष अशोक मुळे (२३) याला अटक करण्यात आली. याशिवाय,एम.एच. १८ डब्ल्यू.८७५५ क्रमांकाचे महेंद्र मॅक्स वाहनातून दारू जप्त केली. वाहन चालक स्वप्नील शामदेव पाल व विकेश जांभुळे (२३) या दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन चारचाकी वाहन, चार भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले.या मुद्देमालाची किमंत २० लाख ७५ हजार ५०० रुपये आहे. आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.ढोरवासा येथे दोन लाखांचा दारूसाठा जप्तभद्रावती : ढोरवासा खाणीजवळील वर्धा नदीच्या घाटावरुन पोलिसांनी दोन लाखांची दारू जप्त केली. मात्र, सर्व आरोपी फरार झाले. ही कारवाई शनिवारी च्या पहाटे करण्यात आली. ढोरवासा घाटावरुन दारूची वाहतूक करणाºया एमएच ३४-एझेड २४४८ व एमएच ३४ एझेड ३८५८ या दुचाकींचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान, आरोपींनी दोन्ही वाहने सोडून फरार झाले. या दुचाकीतून दोन लाखांची दारू जप्त केली. ही कारवाई ठाणेदार बी.डी.मडावी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, सुनील ढवस, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान आदींनी केली. मागील काही दिवसांपासून कारवाई सुरू असल्याचे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.सिंदेवाहीत १४५ पेट्या जप्तसिंदेवाही : वासेरा व आंबोली झुडपात पाठलाग करून पोलिसांनी १४५ पेट्या देशी व विदेशी दारू जप्त केली. दारूसह मुद्देमालाची किंमत २४ लाख ११ हजार रुपये असल्याची पोलिसांनी दिली. चारपैकी तीन आरोपी फरार झाले असून, एकाला करण्यात आली आहे. आरोपीचे नाव संजय रामदास भरडकर (२४) रा. सिंदेवाही असे आहे. एमएच ३४ के-०६७७ क्रमांकाची मारुती,३४-९३४९ क्रमांची टाटा एस आणि एमएच ३४-के-४३९८ क्रमाकांच्या वाहनातून दारू आणत असल्याची माहिती चंद्रपुरातील पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पाठलाग करून ही कारवाई केली.