शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

जिवती शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:47 IST

अतिदुर्गम व संवेदनशील जिवती तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे अर्थ, नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहेत, अशी माहिती जिवती नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. नगराध्यक्ष पुष्पा नैताम तर उपाध्यक्षपदी अशपाक शेख यांनी सोमवारपासून कामकाजाला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : न. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदग्रहण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम व संवेदनशील जिवती तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे अर्थ, नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहेत, अशी माहिती जिवती नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. नगराध्यक्ष पुष्पा नैताम तर उपाध्यक्षपदी अशपाक शेख यांनी सोमवारपासून कामकाजाला सुरूवात केली आहे.अध्यक्षस्थानी आमदार अ‍ॅड. संजय धोटे तर मंचावर जिल्हा परिषद महिला व बालकल्याणसभापती गोदावरी केंद्रे,पंचायत समिती सभापती सुनील मडावी, सुहास अलमस, मुख्याधिकारी विशाखा शेरकी, उपसभापती महेश देवकते, केशव गिरमाजी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुरेश केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कमला राठोड, सुरेश धोटे, मंगेश श्रीराम, रवी बुरडकर, अमर राठोड, संदीप पारखी, न. प. सभापती सुनंदा राठोड, किरण चव्हाण, अनुसया राठोड, रंजना जाधव,कविता आडे, केशव चव्हाण, गोपीनाथ चव्हाण, शामराव गेडाम, राजेश राठोड, आदी उपस्थित होते. जिवती न. प. निर्मिती २०१६ ला झाली. अडीच वर्षानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी चार, काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला. विकासाच्या मुद्यावर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे प्रथमच भाजपाला नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. १० सदस्य असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला. जिवती शहराचा अडीच वर्षांपासून विकास रखडला होता. दरम्यान जिवती नगर पंचायतवर भाजपाचा झेंडा फडकल्याने शहराचा विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार अ‍ॅड. संजय धोटे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिवती तालुक्यातील सर्व प्रश्नांची उत्तम जाणीव आहे. शहराच्या विकासासोबतच तालुक्याचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी आता भरघोस निधी दिला. शहरातील सर्व पायाभूत विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू नये, यासाठी दहा कोटी कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष पुष्पा नैताम व उपाध्यक्ष अशपाक शेख यांनी शहरातील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही मनोगतातून दिली. संचालन राजेश राठोड यांनी केले. गोविंद टाकरे यांनी आभार मानले.दोन टप्प्यांत मिळणार निधीजिवती शहरात विकासाची विविध कामे थंडबस्त्यात आहेत. ही सर्व कामे तातडीने पूर्ण व्हावे, याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून जिवती शहराच्या विकासाकरिता शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले, अशी माहिती सुहास अलमस यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. पहिल्या टप्प्यात ५ कोटी व दुसऱ्या टप्यात ५ कोटी असा एकूण १० कोटी निधीतून शहरातील मूलभूत कामे केली जाणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.