शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूमीपुत्राला अमेरिकेकडून १० कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 10:58 IST

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भूमीपुत्र डॉ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

ठळक मुद्देडॉ. सुदर्शन कुरवडकर स्पॅनिश विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणार

राजेश माडुरवार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भूमीपुत्र डॉ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना तब्बल १.५. मिलियन डॉलर (दहा कोटी रुपये) देण्यात आले आहेत.या रकमेचा वापर कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्पॅनिश विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयात विद्यार्थ्यांचा विकास आणि अधिक संशोधनासाठी हा निधी त्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. या निधीचा सदुपयोग करण्याचा अधिकारही त्यांनाच दिला आहे. ही भारतासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.कॅलिफोर्निया विद्यापीठात अमेरिकसह देश-विदेशातील हजारो तरूण शिक्षण घेतात. मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील कुरवडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यापीठात सहयोगी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण व अभियांत्रिकी या विषयात त्यांचा हातखंडा आहे.विद्यापीठात अमेरिकन विद्यार्थ्यांसह सुमारे चाळीस हजार स्पॅनिश विद्यार्थी शिकत आहेत. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीत हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे असल्याचे डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या लक्षात आले. यामुळे हा वर्ग मुख्य प्रवाहात यावा, यासाठी डॉ. कुरवडकर यांनी एक प्रकल्प तयार केला. यातून त्यांनी स्पॅनिश विद्यार्थ्यांची कैफियत मांडली. सोबत त्यांच्या विकासासाठीच्या विस्तृत उपाययोजना सांगितल्या. अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने या प्रकल्पाची दखल घेतली. यानंतर डॉ. सुदर्शन कुरवडकर यांना तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार दहा कोटी रुपये देण्यात आले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र