शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

Maharashtra Election 2019 ; टोपल्या विकणाऱ्या आईचा पोरगा झाला आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

सकाळी ८ वाजतापासून येथील एसडीओ कार्यालय परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून किशोर जोरगेवार हे आघाडीवर होते. अंतिम फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच राहिली. सहाही विधानसभांमधून ते सर्वाधिक ७२, १०७ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. चंद्रपूर विधानसभेत यापूर्वी १९६२ मध्ये रामचंद्रराव राजेश्वरराव पोटदुखे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

ठळक मुद्देपक्षाने नाकारले; मतदारांनी स्वीकारले : चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार दुसरे अपक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी महायुती आणि महाआघाडी या प्रमुख राजकीय आघाड्यांना पराभुत करीत शानदार विजय प्राप्त केला आहे.किशोर जोरगेवार यांना १, १६, ५५४ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांना ४४, ४४७ मते तर काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना १४, १४१ मते पडली.सकाळी ८ वाजतापासून येथील एसडीओ कार्यालय परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून किशोर जोरगेवार हे आघाडीवर होते. अंतिम फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच राहिली. सहाही विधानसभांमधून ते सर्वाधिक ७२, १०७ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. चंद्रपूर विधानसभेत यापूर्वी १९६२ मध्ये रामचंद्रराव राजेश्वरराव पोटदुखे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर आता किशोर जोरगेवार हे दुसरे विजयी अपक्ष उमेदवार ठरले आहे. किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तिकीटासाठी प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये ते प्रवशितही झाले. मात्र ऐनवेळी त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. मात्र मतदारांनी त्यांना स्वीकारले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर क्षेत्रात सभा घेतल्या. मात्र नाना श्यामकुळेंबाबतची मतदारांमध्ये असलेली नाराजी ते दूर करू शकले नाही. दुसरीकडे किशोर जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जनतेचा कौल मागितला व ते जनतेचे उमेदवार झाले.१,१६,५५४ मिळाली मतेविजयाची तीन कारणे...1मागील काही वर्षांपासून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून किशोर जोरगेवार हे जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत. प्रसंगी आंदोलने करून जनतेच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत आहेत. चंद्रपुरात जनतेला मोफत वीज मिळाली पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.2जनतेचा नेता, सर्वसामान्य माणूस आणि अडी-अडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख.3चंद्रपूर क्षेत्रात जोरगेवार यांचा दांडगा जनसंपर्क.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर