शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी कोणत्या देशांत जाणार तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 06:03 IST

विदेशात नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अभ्यासातून पुढे आले आहे.

नवी दिल्ली : उच्चशिक्षणानंतर अनेक जण विदेशात नोकरीचा निर्धार करीत असतता. आयटीमध्ये शिक्षण घेणारी मुले युरोप, अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जात असतात. या क्षेत्रात अनेक भारतीय तरुण-तरुणींनी चांगले यश संपादन केले आहे. आजवर विदेशात नोकरीसाठी संयुक्त अरब अमिरात हे भारतीयांचे सर्वात आवडते ठिकाण होते. परंतु पसंतीक्रमात हा देश सहाव्या स्थानी घसरला आहे. विदेशात नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अभ्यासातून पुढे आले आहे.

भारतात बंगळुरू, दिल्ली नोकरीसाठी आघाडीवरnयाउलट आता भारतही नोकरी शोधणाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय म्हणून पुढे येताना दिसत आहे. याबाबतीत भारताचे रँकिंग मागच्या पाच वर्षांत ६ पॉइंट्सने सुधारले आहे. nनोकरीसाठी बंगळुरू, दिल्ली ही शहरे सर्वात लोकप्रिय आहेत. ग्लोबल रँकिंगमध्ये या दोन शहरांचे स्थान मात्र घसरले आहे. n२०१८ पासून हा अहवाल जारी करण्यात येत आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच या शहरांच्या यादीत अहमदाबादचा समावेश झाला आहे. nभारतात नोकरी शोधणाऱ्यांमध्ये संयु्क्त अरब अमिरातमधील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर नायजेरिया आणि केनिया या देशातील नागरिकांचा नंबर लागतो.

आता ओढा कुणीकडे?नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांची पसंती सध्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंड या देशांना आहे. रँकिंगमध्ये पहिल्या चार स्थांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड हे देश आहेत. जागतिक स्तरावरील शहरांचा विचार केला असता सर्वात जास्त पसंती लंडनला आहे, तर पहिल्या पाच शहरांमध्ये न्यूयॉर्कचा समावेश होतो.

७८%इतके प्रमाण २०२० मध्ये विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांचे प्रमाण होते. परंतु हे प्रमाण सातत्याने घटताना दिसत आहे.  

५४%इतके प्रमाण २०२३ मध्ये परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्याचे आहे, असे बीसीजीच्या ‘इंटरनॅशनल मोबिलिटी ट्रेंड्स’ हा अहवाल सांगतो. 

टॅग्स :jobनोकरी