शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी टिकवायची? हे कोर्स करा...; प्रमोशन आणि पगारवाढही मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:16 IST

आयटी, बँकिंग, वित्तीयसेवा, विमासेवा, हेल्थ केअर आणि फार्मा आदी क्षेत्रातील कर्मचारी अधिकची कौशल्ये शिकण्यासाठी धडपडत आहेत.

जागतिक स्तरावर सध्या कॉस्ट कटिंग हा शब्द जिकडे-तिकडे कानावर पडू लागला आहे. नामांकित कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना अचानक नारळ दिला आहे. त्यामुळे आपली नोकरी जाऊ नये आणि कंपनीसाठी आपण कसे अधिकाधिक उपयुक्त आहोत, हे पटवून देण्यासाठी सारे जण प्रयत्न करू लागले आहेत. आधी घेतलेल्या शिक्षणाला लोक अधिक कौशल्यांची जोड देत आहेत. 

दिवसाला १ ते ३ तास कोर्ससाठी आयटी, बँकिंग, वित्तीयसेवा, विमासेवा, हेल्थ केअर आणि फार्मा आदी क्षेत्रातील कर्मचारी अधिकची कौशल्ये शिकण्यासाठी धडपडत आहेत.  यामुळे कर्मचाऱ्यांची कंपनीतील उपयुक्तता वाढली आहे, तसेच कंपन्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही यामुळे पूर्ण होत आहे. अपस्किलिंग करणारे कर्मचारी या शिक्षणासाठी दिवसातील १ ते ३ तास देताना दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी या विषयात शिक्षण घेण्याची तयारी दाखविणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटांतील कर्मचारी होते. 

प्रमोशन आणि पगारवाढही पियर्सन स्किल्स आउटलूक अहवालानुसार ८८ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना असे वाटते की, स्वत:चे ज्ञान अपडेट करणे आणि कंपन्यांसाठी असलेली आपली उपयुक्तता कायम राखण्यासाठी अपस्किलिंग करणे अर्थात, शिक्षण-प्रशिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे.  गेल्या वर्षात अपस्किलिंगमुळे ४३ टक्के कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांमध्ये वेतनामध्ये चांगली वाढ मिळाली. १८ टक्के कर्मचाऱ्यांना अपस्किलिंगनंतर आणखी चांगली नोकरी मिळाली.

कोणत्या कोर्सेसना पसंती? अपस्किलिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे प्रमाणित अभ्यासक्रमात ऑनलाइन प्रवेश देणाऱ्या संस्थांची संख्या वाढली आहे. 

मागच्या वर्षात डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची पसंती नोकरीला सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखविली. २०२२ या वर्षात कमीत कमी ८ वर्षे अनुभव असलेल्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांनी पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला दिसला. 

टॅग्स :jobनोकरी