शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅनिमेशन, गेमिंगमध्ये उपलब्ध होणार 20 लाख नोकऱ्या, आता शाळांमध्ये शिकवले जाणार व्हिडिओ गेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:18 IST

jobs in animation vfx gaming sector : सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला अ‍ॅनिमेशन आणि गेमिंगमध्ये रस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण येणारा काळ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. Animation, VFX, Gaming, Comics म्हणजेच AVCG क्षेत्रात अनेक नवीन नोकऱ्या येणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने दावा केला आहे. 

भारत सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, पुढील 8 वर्षांत AVCG क्षेत्रात 20 लाख नवीन नोकऱ्या येणार आहेत. त्यामुळेच सरकार या क्षेत्रांमध्ये शाळा ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत नवीन अभ्यासक्रम आणणार आहे. 

सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे. एवढेच नाही तर या क्षेत्रांमध्ये कंटेंट तयार करणाऱ्यांनाही सरकार तांत्रिक आणि आर्थिक मदत करणार असल्याचे समजते. 

Job Report मधील काय आहेत शिफारसी?केंद्राच्या टास्क फोर्सने आपल्या रिपोर्टमध्ये अनेक शिफारसी केल्या आहेत. अपूर्व चंद्रा हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपला रिपोर्ट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना सादर केला आहे. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, मंगळवार, 27 डिसेंबर 2022 रोजी सरकारने या शिफारसी लवकरात लवकर लागू करण्याचे सांगितले आहे. पुढील प्रमाणे आहेत शिफारसी...

- Create in India Campaign सुरू करणे. या शिफारशीनुसार सरकार देशभरात Create in India मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत, सरकार भारतीय सामग्री निर्मात्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करेल. जेणेकरून या क्षेत्रांमध्ये भारतीय सामग्रीचा प्रचार होईल.- AVCG प्लॅटफॉर्म स्थापित करणे. देशात AVCG क्षेत्रासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केले जाईल. तसेच, स्थानिक सरकारांच्या मदतीने राज्यांमध्ये प्रादेशिक केंद्रे स्थापन केली जातील.- देशातील विविध शहरांमध्ये गेमिंग एक्स्पोचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरुन एफडीआय, को-प्रोडक्शन आणि इनोव्हेशनच्या संधी शोधता येतील.- अॅनिमेशनसाठी दूरदर्शनचे एक समर्पित चॅनेल असावे. रामायण, महाभारत प्रेरीत व्हिडिओ गेम्स तयार करावेत.- हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रत्येक शाळेत किमान दोन प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करावी. एक शिक्षक केजी ते इयत्ता 5वी पर्यंत, तर दुसरा शिक्षक 6वी ते 12वी पर्यंत.- यूजीसी मान्यताप्राप्त AVCG अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर चालवले जावेत. जसे-  PG/ BA in Experiential Arts, Bachelor in Graphic Arts (Comics and Animation Design), BSc in Game Development, Bachelor in Cinematic Arts (Comics, Animation, VFX), Bachelor of Creative Arts and Sciences.

सध्या 1.85 लाख प्रोफेशनलसरकारच्या  इंटर-मिनिस्ट्रियलटास्क फोर्सचे अध्यक्ष चंद्रा म्हणाले, "सध्या भारतात AVCG क्षेत्रात सुमारे 1.85 लाख प्रोफेशनल आहेत. पण, बाजाराला यापेक्षा अधिक कुशल कामगारांची गरज आहे. या क्षेत्राचा विकास टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला 2030 पर्यंत 20 लाख प्रोफेशनलची आवश्यकता असणार आहे." याचबरोबर, मीडियाशी संवाद साधताना टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण जगात AVCG क्षेत्राची बाजारपेठ जवळपास 22.78 लाख कोटी रुपयांची आहे. सध्या यामध्ये भारताचा वाटा 24,855 कोटी रुपये आहे.

टॅग्स :jobनोकरीtechnologyतंत्रज्ञान