शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

RBI मध्ये अधिकारी पदांसाठी भरती, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर असा करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:41 IST

RBI Recruitment 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2022 आहे.

नवी दिल्ली : तरुणांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्रेड ए पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2022 आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून निश्चित करण्यात आली आहे. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3 पदांसाठी जागा आहे. त्यानुसार आरबीआयमध्ये क्युरेटरचे 1 पद, आर्किटेक्टचे 1 पद आणि फायर ऑफिसरच्या एका पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

शैक्षणिक पात्रताक्युरेटर पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर  फायर ऑफिसरसाठी संबंधित विषयातील B.E/B.Tech ची पदवी असावी.

वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावेत आणि अधिक तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

किती भरावे लागेल अर्जाचे शुल्क?या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. सरकारी नियमांनुसार एससी/एसटी/दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. उमेदवारांना सूचित केले जाते की, त्यांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासा जेणेकरून उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन