शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Job Reminder: भरला का अर्ज? आजचा शेवटचा दिवस; लेखी परीक्षेविनाच IDBI बँकेत डायरेक्ट भरती

By प्रविण मरगळे | Updated: January 7, 2021 17:02 IST

IDBI Bank Recruitment 2020: कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा.

मुंबई – मित्रहो, सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण नोकरीच्या शोधात धडपड असतो, अशा युवकांसाठी आपल्या भाषेत सोप्प्या आणि सहज शब्दात तुम्हाला कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, २३ डिसेंबर रोजी आम्ही तुम्हाला IDBI बँकेतील नोकरी भरतीसंदर्भात बातमी दिली होती, कोणत्याही लेखी परीक्षेविना फक्त मुलाखतीच्या आधारे बँकेत नोकरभरती सुरू होती.

या नोकरी भरतीसाठी अर्ज करण्याला २४ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे, परंतु आज ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे अद्यापही अर्ज भरला नसेल तर त्वरा करा आणि आपला अर्ज आजच भरा, कशाला नोकरीची संधी गमावताय? (IDBI Bank Recruitment 2020) इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.

पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे

पदे :

डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदे

असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदे

मॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदे

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदे

एकूण पदांची संख्या - 134

शिक्षणाची अट

वेगवेगळ्या पदांसाठी आणि विभागांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. कोणत्याही विषयातील सामान्य पदवीधारक, बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स व चार्टर्ड अकाउंटेंट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा.

अर्ज कसा कराल?

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून झाली आहे. ७ जानेवारी २०२१ म्हणजे आजच याची मुदत संपणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे.

निवड कशी होईल?

या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.  यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

डायरेक्ट लिंक्स

IDBI Bank SCO notification 2020 साठी इथे क्लिक करा...Apply करण्यासाठी २४ डिसेंबरपासून इथे क्लिक करा... IDBI Bank च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

 

टॅग्स :bankबँकjobनोकरीexamपरीक्षा