शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ५३६९ पदांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:52 IST

एमपीएससी, यूपीएससी, बँकेच्या परीक्षांच्या मानाने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सोपी आहे व पदसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करावी. 

- प्रा. राजेंद्र चिंचाेले(स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट ब, गट क कर्मचारी निवडण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. भारतात सर्वांत जास्त सरकारी रोजगार उपलब्ध करून देणारा सरकारी आयोग अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँकेच्या परीक्षांच्या मानाने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सोपी आहे व पदसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करावी. 

उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतील लाखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने या पदांबद्दल, या परीक्षांबद्दल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधील महाराष्ट्रातील उमेदवारांचा सहभाग व यश हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय सरकारी खात्यांमध्ये मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ११ अंतर्गत ५३६९ रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. ही भरती १० वी, १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्चपर्यंत करायचा आहे. निवड पोस्ट ११ ची परीक्षा जून किंवा जुलै २०२३ मध्ये घेतली जाईल.

पदाचे नाव१) सीनिअर टेक्निकल असिस्टंट२) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर ३) चार्जमन ४) लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट५) फर्टिलाइजर इन्स्पेक्टर ६) कँटीन अटेंडंट ७) हिंदी टायपिस्ट ८) इन्वेस्टिगेटर ग्रेड -II९) लायब्ररी अटेंडंट १०) सीनिअर सायंटिफिक असिस्टंट

वयाची अट१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे  (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण- मॅट्रिक लेवल पदासाठी- १२वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण -इंटरमिजिएट लेवल पदासाठी- भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी- बॅचलर पदवी पदासाठी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३ संगणक आधारित परीक्षा :जून, जुलै २०२३ 

निवड कशी होईल? :ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड होईल.

 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन