Reserve Bank of India Recruitment 2021 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुन्हा एकदा एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल २४१ जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्ड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२१ ही आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार असून ती फेब्रुवरी अथवा मार्च महिन्यात घेण्यात येईल. देशातील १८ शहरांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसंच उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. २४१ पैकी ३२ जागा या एससी, ३३ जागा एसटी आणि ४५ जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ईडब्ल्यूएससाठी १८ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ११३ जागा असतील. १८ ते २५ या वयोगटातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी वर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांना यासाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणारा उमेदवाराचं १ जानेवारी २०२१ पर्यंत पदवीपेक्षा कमी शिक्षण असणं आवश्यक आहे.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती
By जयदीप दाभोळकर | Updated: January 22, 2021 15:59 IST
मुंबईत सर्वाधिक जागा
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती
ठळक मुद्देमुंबईत सर्वाधिक जागादहावीपेक्षा अधिक शिक्षण असलेल्या उमेदवारांचा अर्ज करता येणार नाही