शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Bank Jobs : पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी भरती, Interview च्या आधारे मिळेल नोकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:58 IST

PNB Recruitment 2022 : अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी (Degree) पूर्ण केलेली असावी.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने विशेष कार्यकारी (Specialized Executive) पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) या पदांवर भरतीसाठी एक भरती अधिसूचना   (Notification) जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे.

अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी (Degree) पूर्ण केलेली असावी. पंजाब नॅशनल बँकेमध्ये विशेष कार्यकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान (Minimum) 20 वर्षांचा अनुभव असावा.

अधिसूचनेनुसार (According to Notification) दस्तऐवज पडताळणीच्या आधारावर प्राथमिक तपासणी आणि दस्तऐवज पडताळणीसाठी अर्ज शॉर्टलिस्ट केला जाईल. त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांसाठी नियुक्त केले जाईल आणि 5 वर्षांपर्यंत वाढवता येईल. पात्रता आणि अनुभवाच्या आधारे वेतन दिले जाणार आहे.

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in वर जाऊन भरतीशी संबंधित अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यात दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे जोडून महाव्यवस्थापक- एचआरएडी पंजाब नॅशनल बँक मानव संसाधन विभाग - पहिला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिस सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली-110075 या पत्त्यावर पाठण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :jobनोकरीbankबँकPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक