शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची तारीख जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:16 IST

PNB Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 103 पदांची भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : सरकारी बँकेतनोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB Recruitment 2022) अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 103 पदांची भरती केली जाणार आहे.

महत्त्वाची तारीखअर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट

पदांची माहितीएकूण पदांची संख्या- 103अधिकारी (अग्नि सुरक्षा) : 23 पदेव्यवस्थापक (सुरक्षा) : 80 पदे

शैक्षणिक पात्रताया भरती मोहिमेद्वारे अधिकारी (अग्नि सुरक्षा) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीईची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, व्यवस्थापकाच्या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाअधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.

अर्जाचे शुल्कया पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना 1003 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल आणि SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये 59 आहे.

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकbankबँकjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन