शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एक नूर आदमी, दस नूर कपडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 14:21 IST

कोणतेही करिअर असो, नोकरी असो, व्यवसाय असो त्यात आपण परिधान करीत असलेल्या कपड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही मुलाखतीला आपण जातो, तेव्हा आपल्या दिसण्यावरून अनेक गोष्टी ठरत असतात.

स्वच्छ आणि फ्रेशआजकाल सर्वचजण स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे घालतात. तरीही जे असे करीत नाहीत, त्यांनी याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. आपले करिअर, नोकरी कोणत्या प्रकारचे आहे, ते पाहून त्याला साजेसा लूक असावा. कोठे फॉर्मल वापरायचे, कोठे टी-शर्ट, कोठे फ्लिप-फ्लॉप वापरायचे याचे भान बाळगावे.रंग कोणता?  आपण घालणार असलेल्या कपड्यांचा रंग कोणता असावा, यालाही फार महत्त्व आहे. आपले व्यक्तिमत्त्व कोणत्या रंगात खुलून दिसते, हे वेळोवेळी तपासावे किंवा हितचिंतकांना विचारावे आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय घ्यावा. कुठे मॅचिंग, कुठे प्रिंटेड आणि कुठे प्लेन कपडे घालायचे, याचाही निर्णय घ्या. व्यावसायिक आघाडीवर भडक, चमकदार कपडे घालणे योग्य समजले जात नाही. काही विशिष्ट रंगांचे कपडे घालणे म्हणजे ते विशेष संकेत समजले जातात. तेही लक्षात घ्यावे. एवढेच नव्हे, तर पँट आणि मोज्यांचा रंग मॅचिंग असावा, असे अलिखित संकेत आहेत.घट्ट की सैल? कपडे घट्ट घालावेत की सैल, हाही महत्त्वाचा मुद्दा समजला जातो. आपल्या शरीराला साजेसे कपडे असावेत. फार सैलही नको आणि फार घट्टही नको. अगदी योग्य आकाराचे अपडे असावेत. फिटिंग योग्य नसलेले कपडे आपली प्रतिमा बिघडवू शकतात; तसेच समोरच्या व्यक्तीचे लक्षही विचलित करू शकतात.कपडे कोणते? चांगले कपडे म्हणजे महाग कपडे असे अजिबात नव्हे. कॉटन किंवा पॉलिस्टर मिक्स असलेले फॅब्रिकही उत्तम आहेत. ते परवडणारेही आहेत आणि कमी किमतीत ऑनलाइन खरेदी करता येतात.सिझन महत्त्वाचा   कोणत्या सिझनमध्ये कोणते कपडे घालायचे, यालाही फार महत्त्व आहे. त्याचबरोबर कोणत्या कार्यालयात, कामाची वेळ कोणती आहे, हेही ध्यानात घ्यावे लागते. एकंदरीत कोठे फॉर्मल कपडे घालायचे आणि कोठे नाही, हे प्रत्येकाला तारतम्याने ठरवावे लागेल. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सूट, बूट, टाय अपेक्षित आहे. जाहिरात, आयटी कंपन्यांत तर कोणते कपडे चालतात, हे आपणा सर्वांना माहिती आहे.चला तर मग आपल्या कपड्यांबाबत अधिक सजग होऊन आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसण्यासाठी विशेष प्रयत्न करूया.  संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन