शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Naval Dockyard मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 12:52 IST

Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2022) काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आज यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

मुंबई : नौदलात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड मुंबईने (Naval Dockyard Mumbai) काही दिवसांपूर्वी अप्रेंटिसच्या (Naval Dockyard Mumbai Recruitment 2022) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. 

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2022) काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आज यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे, पात्र आणि इच्छुक असूनही, जर काही कारणास्तव तुम्हाला आत्तापर्यंत अर्ज करता आला नसेल, तर आत्ताच करा. 

नेव्हल डॉकयार्ड मुंबई (Naval Dockyard Mumbai Bharti 2022) अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे. या भरतीतून 338 पदे भरली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्टायपेंड तसेच डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाईल. 

शैक्षणिक पात्रताअर्जदार उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 2002 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा.

निवड प्रक्रियालेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा 22 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. लेखी परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांनाच मुलाखत चाचणी आणि कौशल्य चाचणीत बसण्याची संधी दिली जाईल.

या वेबसाइटद्वारे करा अर्ज...नेव्हल डॉकयार्ड मुंबईच्या  (Naval Dockyard Mumbai Maharashtra Apprentice Recruitment 2022)  फक्त अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी इच्छुक उमेदवार dasapprenticembi.recttindia.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. नेव्हल डॉकयार्ड मुंबईच्या या भरती मोहिमेद्वारे अप्रेंटिसच्या एकूण 338 पदांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमधील प्रशिक्षणासाठी, उमेदवारांना आधी नावनोंदणी करावी लागेल.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलMumbaiमुंबईjobनोकरी