शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दिवसाचे ६० सेकंद बाजूला काढा आणि घरात लावा पैशाचं झाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:14 IST

हा एक मिनिट जर योग्य पद्धतीनं वापरलात, अनावश्यक खर्चात होईल बचत..

ठळक मुद्देसकाळी उठल्यावर आपल्या खर्चाचा टोन फक्त सेट कराजो खर्च होतोय तो खरोखरच योग्य कारणासाठी आहे का, हा खर्च मी पुढे ढकलला तर चालणार आहे का, नाहीच केला तर काय बिघडेल.. असा फक्त विचार करायचा.त्यासाठी दिवसातला एक मिनिट पुरेसा आहे.

- मयूर पठाडेखर्चावर नियंत्रण ठेवा, फार खर्च करू नका, वायफळ खर्च तर अजिबातच नको.. हे आपल्यालाही पटतंच.. त्याला विरोध कोणाचा असणार आहे?.. पण खरंच आपण तसं करतो, वागतो? किंवा तशी कृती प्रामाणिकपणे आपल्याकडून घडते?.. खरं सांगायचं तर त्याबाबत आपण सिस्टेमॅटिक पद्धतीनं विचारच केलेला नसतो. गरज पडली, म्हणून घेतली वस्तु, केला खर्च.. असं प्रत्येकाचंच होतं. त्याबाबत फार विचार कोणीच केलेला नसतो, पण लोकांच्या खर्चाच्या मानसिकतेचा अभ्यास केलेले तज्ञ आता सांगतात, त्यासाठी फार अभ्यास करण्याचीही गरज नाही, नजर मात्र असायलाच हवी. आपल्या खिशातून पैसा कसा जातो, कुठे जातो, कशासाठी जातो, याकडे नुसती नजर असली, तरी आपण आपला पैसा वाचवून शकतो आणि त्याला अटकाव घालू शकतो.यासंदर्भात अनेक अभ्यासकांचं आता म्हणणं आहे, त्यसाठी फार नाही, दिवसाचे तुमचे केवळ साठ सेकंद पुरेसे आहेत. सकाळी उठल्यावर तुमच्या खर्चाचा टोन फक्त सेट करा, त्याच्या बाहेर जाऊ नका आणि दिवसभरात मी आज माझा जो काही खर्च होईल, तो या दिशेच्या पलीकडे होणार नाही, याकडे लक्ष ठेवा.. तो खरोखरच योग्य कारणासाठी आहे का, हा खर्च मी पुढे ढकलला तर चालणार आहे का, नाहीच केला तर काय बिघडेल.. असा फक्त विचार करायचा. त्यासाठी दिवसातला एक मिनिट पुरेसा आहे.यासंदर्भात एक मोठा अभ्यसही करण्यात आला. हा अभ्यास सांगतो, रोज सकाळचा हा फक्त एक मिनिट तुमचे खूप पैसे वाचवतो आणि तुमच्या खर्चावर बंधनं टाकतो. हे आपोआप घडतं.. अशा अनावश्यक खर्चाला आपण आळा घातला तर आपल्याही घरातील पैशाची पुंजी हळूहळू वाढू लागेल आणि अंतिमत: तुमच्या लक्षात येईल, अरे, हा खर्च जर आपण अगोदरच टाळला असता, तर खरोखरच आवश्यक असणाºया कितीतरी गोष्टींसाठी, आपल्या, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठ हा पैसा आपल्याला वापरता आला असता..काही हरकत नाही, ही एक मिनिटाची ट्रिक आपल्याला आता कळली आहे. त्याचा वापर करुन आपल्या घरातलं पैशाचं झाड आपण वाढवू! लखपती, करोडपती होऊ!..