शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत अधिकारी होण्याची आज शेवटची संधी, 7 हजार पदांसाठी होणार भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:48 IST

IBPS PO Recruitment 2022/Bank JOB : बँक पीओ (Bank PO) बनण्यास इच्छुक असलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्‍शन (IBPS) 6 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या (PO) जवळपास 7000 रिक्त पदांची भरती करणार आहे. या भरती मोहिमेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधील पदवीधर किंवा उमेदवार या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आजची (22 ऑगस्ट 2022) शेवटची आहे. बँक पीओ (Bank PO) बनण्यास इच्छुक असलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IBPS ने बँक पीओच्या 6932 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी IBPS ने 1 ऑगस्टला सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाने 6,432 प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीतील सर्वाधिक रिक्त जागा कॅनरा बँकेत आहेत. एकूण 6932 पैकी 2799 पदे आरक्षित आहेत. एससी प्रवर्गासाठी 1071 पदे, एसटी प्रवर्गातील 520 पदे, ओबीसीसाठी 1876 आणि ईडब्ल्यूएससाठी 666 पदे भरण्यात येणार आहेत.

सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या निवडीसाठी प्रिलिम्स आणि मुख्य ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर IBPS पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावेल. प्रवेशपत्र, परीक्षेसह सर्व महत्त्वाच्या तारखांची माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेली आवश्यक माहिती तपासावी. पहिल्यांदा IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जा. त्यानंतर होम पेजवर दिसणार्‍या PO Recruitment च्या लिंकवर जा. त्यानंतर आता स्वतःचे रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन करा. त्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शेवटी, फी जमा करा आणि फायनल सबमिट करा, त्यासोबत तुमच्या भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा.

अर्जाच्या फी संदर्भात माहितीया नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 850 रुपये ठेवण्यात आले आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये फी  आहे. फी जमा करण्याची आज 22 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उमेदवार अधिसूचनेत सर्व आवश्यक माहिती तपासू शकतात. 

टॅग्स :bankबँकjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन