शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास असणाऱ्यांसाठी CISF मध्ये मोठी भरती, मिळणार 81 हजार पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:14 IST

CISF Recruitment 2022 : सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबलपदासाठी भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफ (CISF Recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबलपदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येतील. 249 पदांवर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. 

cisf.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छूक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल. सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी बारावी पास आणि स्पोर्ट्स कोटामध्ये प्रतिनिधित्व केलेलं असणं महत्त्वाचं आहे. वय वर्ष 18 ते 23 असलेल्यांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. तसेच एससी आणि एसटीसाठी वयात पाच वर्षांची सूटही दिली जाणार आहे. तर ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना तीन वर्षांची सूट दिली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सीआयएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवता येईल. 

नोकरी मिळाल्यास 25 हजारांपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार

संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळाल्यास 25 हजारांपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. यासाठी इच्छूक उमेदावारांना 31 मार्चच्या अगोदर आपला अर्ज द्यावा लागणार आहे. महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातींमधील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही आहे. तर इतर सर्व वर्गातील उमेदावारांकडून 100 रुपये शुल्क अर्जासाठी आकारलं जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरी