शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय उत्तीर्ण तरुणही सैन्यात होऊ शकतात अग्निवीर; जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:53 IST

फिटर, टेक्निशियन, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती असते. अर्ज लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात तरुणांची भरती आता अग्निवीर अंतर्गत केली जात आहे. आयटीआय पास आणि डिप्लोमाधारकही भारतीय लष्करात अग्निवीर होऊ शकतात. त्यासाठी सैन्यदलामार्फत टेक्निकल शाखेअंतर्गत भरती केली जाते. फिटर, टेक्निशियन, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती असते. अर्ज लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात. 

अर्ज करण्यासाठी तरुणांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असले पाहिजे. भरतीसाठी लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करताना उमेदवारांना आपली सर्व शैक्षणिक इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अग्निवीर भरतीमध्ये आयटीआय उत्तीर्ण तरुणांना सैन्य इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देते. त्यांना किमान 20 ते कमाल 50 गुणांपर्यंतचा बोनस दिला जातो.

या पदांवर केली जाते भरती टेक्निकल श्रेणी अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक आणि कम्प्युटर यांसारख्या क्षेत्रांसाठी भरती असते. तसेच, टेक्निकल सहाय्यक श्रेणीमध्ये लेखा, स्टोअरकीपर आणि लिपिक यासारख्या पदांवर भरती केली जाते. याशिवाय, फिटर, वेल्डर, कारपेंटर, मोटार मेकॅनिक आणि टेक्निशियन अशा अनेक पदांवर भरती केली जाते.

कशी केली जाते निवड?या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लष्कारतर्फे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते.

अशाप्रकारे अर्ज करू शकता- लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.- नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि वाचा.- अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.- सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.- आता सबमिट करा.

दरम्यान, अग्निवीर अंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात तरुणांची भरती होते. याबरोबर बारावीनंतर एक वर्षाचा आयटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 30 गुणांचा बोनस दिला जातो, तर बारावीनंतर दोन वर्षांचा आटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 50 गुणांचा बोनस दिला जातो. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन