ITBP Recruitment 2024: जर तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने (ITBP) हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रक्रिया 24 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि 22 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेत 51 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीशी संबंधित पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या...
रिक्त जागा हेड कॉन्स्टेबल- 07 पदेकॉन्स्टेबल- 44 पदे
पात्रता निकषहेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10+2 उत्तीर्ण केलेले असावे.कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादाहेड कॉन्स्टेबल पदासाठी: अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.कॉन्स्टेबल पदासाठी: अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.
- वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी निर्णायक अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 असणार आहे. उमेदवारांचा जन्म 23 जानेवारी 2000 पूर्वी आणि 22 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा. अर्ज सादर केल्याच्या तारखेला उपलब्ध मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटमध्ये नोंद केलेली जन्मतारीख वय निश्चित करण्यासाठी पुरावा म्हणून स्वीकारली जाईल आणि त्यानंतरच्या कोणत्याही बदलाची विनंती विचारात किंवा स्वीकारली जाणार नाही.
निवड प्रक्रियाया पदांसाठी निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक चाचणी, तपशीलवार वैद्यकीय चाचणी आणि पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.
अर्ज शुल्कअनारक्षित, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटगरीशी संबंधित पुरुष उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिकांच्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, वेबसाइटच्या ऑनलाइन पेमेंट गेटवे प्रणालीद्वारे पेमेंट केले पाहिजे. यासंबंधी अधिक माहितीसाठी, उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.