शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काय करणार निर्णयच घेता येत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:21 IST

अनेक जणांना छोटे छोटे निर्णयही घेता येत नाहीत, लोक काय म्हणतील याचाच ते जास्त विचार करतात.

ठळक मुद्देआपल्याला काय हवं आहे याचा नेमका विचार करा.रिस्क घ्या.मनानं निर्णय घेत असाल तर त्याला बुद्धीची जोड द्या.

-योगिता तोडकर

रोज आपण अनेक निर्णय घेत असतो, अगदी आत्ता चहा घेऊ कि खाऊ इथेपासून ते आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींना कलाटणी  देणार्‍या निर्णयांर्पयत.

निर्णय घेताना अनेक घटक कार्यरत असतात. पण थोडक्यात त्याचे वर्गीकरण करायचे झाले तर आंतरिक आणि बाह्य घटक असे ढोबळमानाने आपण करू शकू.

आपल्या आंतरिक घटकांमध्ये भावना, विचार, अनुभव असे अनेक खेळाडू असतात. पण त्यात चौकार न षटकार मारणारे दोनच. मन काय सांगतंय (इंटय़ुशन) आणि विचार करायला लावणारी बुद्धी.

आता या दोनपैकी महत्वाचं कोण? 

काही निर्णय आपल्याला खूप जलद घ्यावे लागतात, त्यावेळेस बहुतांशपणे मन काय कौल देतंय याचाच आधार घेतला जातो. पण काही वेळेस आपण घेतलेल्या निर्णयांचा खूप जास्त काळापर्यंत आपल्या आयुष्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, अशा एक ना अनेक स्तरांवर होणार असेल तर उत्तम मार्ग म्हणजे मन काय सांगतंय याला बुद्धीची जोड देणं.

असे निर्णय घेताना सर्व प्रथम  मला काय हवं आहे याचा विचार करावा. एक समुपदेशक म्हणून जेंव्हा मी पाहते तेंव्हा मला असे दिसून आलं कि आपण लहानपणापासून मुलांना निर्णय घ्यायला शिकूच देत नाही. एकतर त्याच्या वतीने पालकच निर्णय घेत असतात. अथवा जेंव्हा मुलं निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो तेंव्हा सगळ्यात पहिले त्याला समाजाचे भय दाखवतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मला काय वाटतं, मला काय हवं यापेक्षा लोक काय म्हणतील याचा पगडा जास्त असतो. त्यामुळे समाज या पगड्याला काही वेळासाठी दूर ठेऊन स्वतर्‍च्या विचारांचा, आवडीचा नेमका शोध घ्यावा. कारण जेंव्हा माणूस स्वतर्‍च्या मनाला मारून निर्णय घेतो तेंव्हा तो निर्णय त्याच्या आयुष्यावर तितक्याच वाईट पद्धतीने परिणाम करतो जेवढा मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानं होण्याची शक्यता असते. किमान जेंव्हा माणूस नेमका मार्ग शोधून निर्णय घेतो, तेंव्हा त्याची कामिगरी लक्षणीय असते. कारण त्याचा निर्णय त्याची जबाबदारी असते. 

पण  स्वतर्‍ला जे हवं आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला तर त्यामुळे होणारं नुकसान व लाभ लक्षात घ्यावा. जो निर्णय आपण घेऊ इच्छितो त्याला समाजाची जोड कशी मिळू शकते याचा पूरक विचार करावा. आपल्या निर्णयासाठी थोडीशी लवचिकता व त्यासाठीची योग्य वेळ हे एकत्न आणलं तर समाजाची साथ नक्कीच मिळू शकते. निश्चितच निर्णय घेतल्यानंतर आयुष्यच्या ज्या स्तरावर बदल व नुकसान होणार आहे त्यासाठी विचार करून नेमके मार्ग काढता येऊ शकतात. फक्त कोणताही निर्णय घेताना साहस हवं. ते सर्व गुणांची जबाबदारी घेतं.

निर्णय घेताना परिस्थिती आपल्या हातात असो वा नसो, जर आपण आपले मन व विचार यांची अशा पद्धतीने योग्य सांगड घातली तर निश्चितच योग्य ते व योग्य पद्धतीने निर्णय आपण घेऊ शकतो.

( लेखिका समुपदेशक आहे.)