शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त, सरकारी भत्त्यांच्या सुविधाही मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:27 IST

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

नवी दिल्ली : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय संशोधन संस्थेने (ISRO) चालक (ड्रायव्हर) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 13 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

हलके वाहन चालकासाठी 9 पदे निश्‍चित करण्यात आली आहेत. तसेच, या भरती प्रक्रियेद्वारे अवजड वाहन चालकाच्या 9 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. दरम्यान हलके वाहन चालकाच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एसएसएलसी, एसएससी मॅट्रिकसह 10 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे वैध LVD लायसन्स असले पाहिजे. तसेच हलके वाहन चालक म्हणून तीन वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

अवजड वाहन चालक पदाबद्दल बोलायचे तर या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण असावेत. तसेच, त्यांच्याकडे एसएसी, एसएसएलसी पात्रता असावी. याशिवाय उमेदवारांकडे मान्यताप्राप्त HVD लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच, जड वाहन चालक म्हणून 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय सार्वजनिक सेवा बिल्ला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियाया पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे दरम्यान असावी. याचबरोबर, उमेदवारांची निवड प्रक्रियेबद्दल सांगायचे झाल्यास सर्वप्रथम तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. यासोबतच उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यातून जावे लागेल. यानंतर या सर्व टप्प्यांची पूर्तता केल्यानंतर, उत्तीर्ण उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच, उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. यासोबतच अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचे लाभही दिले जाणार आहेत.

टॅग्स :jobनोकरीisroइस्रो