शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:55 IST

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे

नवी दिल्ली- 

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे आणि त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो. यातच भारतीय कर्मचारी वर्गासाठी खुशखबर आहे. जगातील एकूण १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी सातत्यानं वाढत आहे. महत्वाची बाब म्हणजे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांचीही संख्या वाढली आहे. 

कोरोना काळाच्या आधी जितके भारतीय लोक परदेशात नोकरीसाठी गेलेले आता कोरोनानंतरच्या काळात त्यात दुपटीनं वाढ झाली आहे. कोरोनानंतर आता जग हळूहळू आर्थिक बाबतीत रुळावर येत असल्याची ही चिन्हं आहेत. जागतिक बाजार जसजसा उभारी घेत आहेत. तसं भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचाही देशाला मोठा फायदा होतो, कारण त्यांनी पाठवलेल्या पैशातून सरकारला मदत होते. गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशात ८७ अब्ज डॉलर्स पाठवले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात परदेशातून आपल्या नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती?परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की कोविड महामारीपूर्वी 2019 मध्ये परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ९४ हजार होती. आता यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे, कारण आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या १.९० लाखांवर गेली आहे. १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे. जिथं भारतीयांना प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन चेक आवश्यक (ECR) पासपोर्ट आवश्यक आहे.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनInternationalआंतरराष्ट्रीय