शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, SSC अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, १ लाखापेक्षा अधिक पगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 08:42 IST

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलामधील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

मुंबई - भारतीय नौदलाने हल्लीच B.E./B.Tech उत्तीर्ण उमेदवारांसाठी विस्तारित नौदल अभिविन्यास अभ्यासक्रम-जानेवारी २०२२ (एसटी२२)साठी ५० एसएससी अधिकाऱ्यांची भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी २६ जूनपूर्वी www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. 

या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढील प्रमाणे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १२ जून २०२१ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२१ 

पदांचे विवरण: भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी वर्गातील एकूण ५० पदांसाठी अर्ज करण्यासाठी ब्रँच किंवा कॅडरनुसार पदांचे विभाजन केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. - एसएससी जनरल सर्व्हिस (GS/X): ४७ पदे - हायड्रो कॅडर: ३ पदे 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. -या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार बीई/बीटेक परीक्षेत कुठल्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे.- या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी १९९७ नंतर आणि १ जुलै २००२ पूर्वी झालेला असणे आवश्यक आहे. 

वेतन भारतीय नौदलातील एसएससी अधिकाऱ्याच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल-१० नुसार ५६ हजार १०० पासून १ लाख १० हजार ७०० पर्यंत वेतन दिले जाईल. 

-विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदलjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी