भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात नाविक जनरल ड्यूटी, सेलर, डोमेस्टिक ब्रांच आणि मेकॅनिकल या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले. या नोकरीसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in येथे भेट द्यावी.
या भरतीअंतर्गत भारतीय तटरक्षक दलात एकूण ६३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात जनरल ड्युटी- २६० जागा, मेकॅनिकल- ३० जागा, इलेक्ट्रिकल- ११ जागा, इलेक्ट्रॉनिक्स- १९ जागा भरल्या जातील. त्यानतंर दुसऱ्या टप्प्यात जनरल ड्युटी आणि नाविक (डोमेस्टिक ब्रांच) पदाच्या ५० जागा भरल्या जातील.
भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली.जनरल ड्यूटी: उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.डोमेस्टिक ब्रांच: या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. टेक्निकल पदे: उमेदवाराने एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये २ ते ४ वर्षांचा डिप्लोमा आणि १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भारतीय तटरक्षक दलात निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी आणि भत्ते दिले जातील. जनरल ड्यूटीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इतर भत्त्यांसह २१ हजार ७०० मिळेल. टेक्निकल पदांसाठी उमेदवारांना २९ हजार २०० रुपये मिळतील.