शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

बँकेत नोकरी! प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज कसा कराल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 10:12 IST

IBPS Recruitment : ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  बँकेत सरकारी नोकरी करण्यासाठी एक चांगली बातमी आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) तुमच्यासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही नोकरी प्रोग्रामिंग असिस्टंटच्या ( Programming Assistant) पदांसाठी आली आहे. IBPS या बँक नोकरीच्या रिक्त जागांसाठी त्वरित भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वॉक-इन निवड प्रक्रियेद्वारे भरती केली जाईल. या सरकारी नोकरीसाठी कोण अर्ज करू शकतो? निवड कशी होईल? वाचा सविस्तर...

IBPS प्रोग्रामिंग असिस्टंट रिक्रूटमेंट 2022 साठी आधी फॉर्म भरण्याची गरज नाही. पुढील अधिसूचनेसह फॉर्म देखील देण्यात आला आहे. ते डाउनलोड करा, भरा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 14 डिसेंबर 2022 रोजी IBPS, IBPS हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, ऑफ डब्ल्यूई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई- 400101 या या पत्त्यावर पाठवा.

किती मिळेल वेतन?ज्यांना IBPS द्वारे बँकेत प्रोग्रामिंग असिस्टंटची नोकरी मिळते, त्यांना ग्रेड B नुसार वेतन मिळेल. ibps.in वर जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार तुमचे मूळ वेतन दरमहा २५ हजार रुपये असणार आहे. सुरुवातीच्या वेतनश्रेणीनुसार, तुम्हाला दरमहा सुमारे 47,043 रुपये मिळतील. याशिवाय, नियमानुसार पीएफ, वैद्यकीय सुविधा, एलटीसी, वृत्तपत्र बिल, कॅन्टीन सबसिडी, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीसह इतर फायदे मिळतील. या सर्वांसह, तुमचे वार्षिक सीटीसी 9 लाख रुपये असणार आहे.

शैक्षणिक योग्यताB.Tech, MCA, B.Sc IT, BCA, B.Sc Computer Science किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पदवी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय किमान 23 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. याशिवाय, काही महत्त्वाच्या कौशल्यांचीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती उमेदवार IBPS Programming Assistant Notification 2022 वरून मिळवू शकतात.

निवड प्रक्रियासर्वात आधी अर्जांची शॉर्ट लिस्टिंग होईल. त्यानंतर 90 मिनिटांची ऑनलाइन टेस्ट होईल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेत अ‍ॅप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेजमधून 100 गुणांचे एकूण 100 प्रश्न विचारले जातील. दोन्ही विषयांचे 50-50 गुणांचे 50-50 प्रश्न असतील. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

टॅग्स :bankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन