शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

JOB Alert : सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती, जाणून घ्या, अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:21 IST

Govt Bank Job Vacancy : सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया... 

नवी दिल्ली - देशातील लाखो लोक बँकेची नोकरी (Bank Job) शोधत असतात. याच दरम्यान देशातील 12 सरकारी बँकांमध्ये तब्बल 40 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या बँकांमध्ये बँक अधिकारी (Bank Officer), कर्मचारी (Clerk) आणि सह कर्मचाऱ्यांच्या (Sub Staff) हजारो पदांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनीच ही माहिती लोकसभेत लेखी उत्तरांद्वारे दिली आहे. सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया... 

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण 8,05,986 पदे मंजूर आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की यापैकी सुमारे 95 टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, 41,177 पदे अद्यापही रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये आहेत.

कोणत्या बँकेत किती पदे?

एसबीआई (SBI) मध्ये तूर्त 8,544 पदे रिक्त आहेत. एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी 3,423 पदे अधिकारी पदाची आणि 5,121 पदे लिपीक स्तरावरची आहेत. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) 6,743 पदे भरायची आहेत. तिसऱ्या स्थानी आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India). या बँकेत 6,295 पदे रिक्त आहेत. इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत 5,112 पदे रिक्त आहेत. बँक ऑफ इंडियात (BOI) रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या  4,848 आहे.

कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?

बँक अधिकारी (Bank Officer Vacancy) – 17,380बँक क्लर्क (Bank Clerk Vacancy) – 13,340सब स्टाफ – 10,457

'या' 12 बँकांमध्ये आहेत रिक्त पदे

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)बँक ऑफ इंडिया (बीओआय)बँक ऑफ बडोदा (बीओबी)बँक ऑफ महाराष्ट्रसेंट्रल बँक ऑफ इंडियाकॅनरा बँकइंडियन बँकइंडियन ओवरसीज बँकपंजाब नॅशनल बँक (पीएनबी)पंजाब अँड सिंध बँकयूको बँकयूनियन बँक ऑफ इंडिया

लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता की, या सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या असलेल्या टंचाईशी सरकार अवगत आहे का? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे देशातल्या या सार्वजनिक बँका आपले काम योग्य पद्धतीने करू शकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरादाखल निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एकूण स्वीकृत पदांपैकी 95 टक्के भरती झाली आहे. गेल्या 6 वर्षांपासून कोणतंही पद कमी केलेलं नाही. बँक रिक्रूटमेंट एक निरंतर प्रक्रिया आहे, जी संबंधित बँका आवश्यकतेनुसार पूर्ण करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरीSBIएसबीआय