शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:26 IST

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 32, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 32 विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

    इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,  विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.महत्त्वाचे शब्द :

  •  माया-ममता , मुलीचे नाव, कपडे शिवताना सोडलेली जागा
  •  घाट - डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या
  • तीर- काठ, बाण,
  • धड- शरीराचा भाग, अखंड स्पष्टपणे
  • काळ- वेळ, मृत्यू, यम
  •  ओढा- मनाचा कल, पाण्याचा प्रवाह
  •  अंक- मांडी, संख्या, नाटकाचा भाग
  •  डाव- कारस्थान, कपट, खेळी
  • द्वीज- पक्षी, ब्राम्हण
  •  कळ- भांडणाचे कारण, वेदना, किल्ली
  •  दंड- शिक्षा, बाहू, काठी
  •  सुमन- पवित्र मन, फूल नाव
  • हार- पराभव, फुलांची माळ
  • वर- आशीर्वाद, वरची दिशा, लग्न ठरलेला पुरूष
  •  पेय- पाणी, दूध
  •  नाद- छंद, आवाज
  •  पर- परका, पीस, माशाचा अवयव
  •  पात्र- भांडे, लायक, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका
  • पूर- नगर, पाण्याचा पूर
  •  घट- लहान मडके, तोटा
  •  भाव- किंमत, भावना
  • कर- हात, सारा
  • विभूती- महान पुरूष, अंगारा, भस्म, रक्षा
  • सूत- धागा, सारथी
  • वात- वारा, विकार, दिव्याची वात
  • वास- गंध, वस्ती
  •  वारी- पाणी, नियमित फेरी
  • वाली- रक्षणकर्ता, एका वानराचे नाव
  • भेट- भेटणे, नजराणा
  • मान- मोठेपणा, शरीराचा भाग
  • दल- सैन्य, पान
  •  जलद- ढग, लवकर 
  • नमुना प्रश्न
  • अधोरिखत शब्दाचा अचूक अर्थ, दिलेल्या पर्यायातून शोधा व पर्याय क्रमांक रंगवा 

(1)  प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला (2017)(1) माळ (2) पराभव (3) दागिना (4) ओझे(2) ‘ मनी नाही भाव आणि देवा मला पाव’(1) दर (2) गर्व (3) भक्ती (4) किंमत(3) माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला(1) भाऊ (2) अंदाज (3) दर (4) हिशेब(4) सैनिकांनी सीमेवर खडा पहारा दिला.(1) लहान दगड (2) उभे (3) सशस्त्र (4) दिला(5) त्याच्या पोटात कळ आली(1) किल्ली (2) वेदना (3) कळी 4) कलह(6) ‘तीर’ या शब्दाचे दोन भिन्न अर्थ असलेला पर्याय ओळखा.(1) पाठ, कमान (2) धनुष्य, दोरी (3) बाण, काठ (4) बाण, धनुष्य( 7) त्याने आपल्या करांनी कर भरला(1) हात (2) सारा (3) काम (4) पैसे(8) सुमनने सुमनाने सुमन वाहिले.(1) चांगली भावना (2) मुलगीचे नाव (3) फूल (4) हातउत्तरसूची :(1) 2 (2) 3 (3) 3 (4) 3 (5) 2 (6) 3 (7) 2 (8) 1

 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार