शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्या नऊ पुस्तकांचे डोंबिवलीत होणार एकाचवेळी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:28 IST

अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यांच्याहस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. रघुलीला एंटरप्रायझेस, रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट, मधुमालती एंटरप्रायझेस आणि दत्तनगर उत्कर्ष मंडळ या चार संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी सुधीर जोगळेकर आणि माधव जोशी निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत.

ठळक मुद्दे २० जानेवारीला साहित्य संध्याचे आयोजन

डोंबिवली : एखादया पुस्तकाचे लेखन करून प्रकाशन करणे ही प्रदीर्घ प्रक्रिया. विषय निवड, मांडणी, त्यानंतर संपादन आणि प्रकाशन अशी प्रदीर्घ प्रक्रिया यासाठी असते.मात्र लेखक, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यांच्याहस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. रघुलीला एंटरप्रायझेस, रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट, मधुमालती एंटरप्रायझेस आणि दत्तनगर उत्कर्ष मंडळ या चार संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी सुधीर जोगळेकर आणि माधव जोशी निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत.थेंब थेंब आयुष्य ( कविता संग्रह )ह्ण, वही आयुष्याची ( कविता संग्रह ), मनरंगी ( कविता संग्रह ) , गुंतवणूक तुमची माझी ( लेख संग्रह ), मनातलं मनातच या नवीन पुस्तकांबरोबरच गुंतवणूक पंचायतन ( चौदावी आव्रुत्ती ) , मार्केट मेकर्स ( तिसरी आव्रुत्ती ) , मला भावलेले गुलजार ( दुसरी आव्रुत्ती ) ,मल्हार मनाचा ( दुसरी आवृत्ती) या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन होणार आहे.एनएसडीएलमध्ये उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असतानाच एक लेखक म्हणून टिळक यांनी स्वत:ची वेगळी छबी निर्माण केली आहे. हा संपूर्ण प्रवास यानिमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार असून सौरभ सोहोनी टिळक यांच्याशी सुसंवाद साधणार आहे.याचबरोबर निखिलेश सोमण आणि आदिती जोगळेकर- हर्डीकर टिळक यांच्या पुस्तकांचे विश्लेषण करणार आहेत.याचबरोबर संकेत ओक, मधुरा ओक, निलय घैसास, प्राजक्ता वैशंपायन हे चंद्रशेखर टिळक यांच्या कथा आणि कवितांचे अभिवाचन करणार आहेत. या सोहळ्याला सर्वांना प्रवेश खुला असणार असून अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण