शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ECIL मध्ये नोकरीची उत्तम संधी! २८४ जागांसाठी पदभरती; शेवटची तारीख काय? पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:46 IST

ECIL Recruitment: दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी कामाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी असून, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...

ECIL Recruitment: गेल्या अनेक महिन्यांपासून खासगी तसेच सरकारी अनेक विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोनानंतर बहुतांश जग पूर्वपदावर आलेले असताना पुन्हा एकदा नवीन सुरुवात जोमाने व्हावी, यासाठी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या नोकरभरती करताना पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronic Corporation Of India Limited, ECIL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २८४ पदे भरली जातील.

यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत अनेक ट्रेड अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षादरम्यान असावे. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे तर एससी, एसटी उमेदवारांसाठी ३० वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. ८ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

दरम्यान, या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन