शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:03 IST

Central Bank of India Recruitment: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली. उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. अर्ज करण्यापूर्वी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकता.  निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये स्टायपेंड मिळेल. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असायला हवा. याशिवाय, उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. एससी/एसटी/ओबीसी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट देण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, तीन टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाईल. सुरुवातीला उमेदवाराची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची स्थानिक भाषा चाचणी होईल. शेवटच्या टप्प्यात उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

अर्ज शुल्क पीडब्ल्यूबीडी उमेदवार: ४०० रुपयेएससी/एसटी/सर्व महिला उमेदवार/ईडब्ल्यूएस: ६०० रुपये + जीएसटीइतर सर्व उमेदवार: ८०० रुपये + जीएसटीअर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

अर्ज कसा करायचा?- सर्वात प्रथम उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in येथे भेट द्यावी.- होमपेजवर Apprentice Recruitment 2025 हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.- नवीन नोंदणी करा आणि लॉगिन आयडी तयार करा.- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.- त्यानंतर अर्ज शुल्क भरा.- अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट स्वत:जवळ ठेवा.