शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, ४००० जागांसाठी भरती; असा करा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:59 IST

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदाने  एकूण ४००० अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

Bank of Baroda Recruitment 2025 : नवी दिल्ली : पदवीधर झालेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB)  अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया १९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ११ मार्च २०२५ पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

बँक ऑफ बडोदाने  एकूण ४००० अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अप्रेंटिस उमेदवारांची ही पदे भरली जातील. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. तसेच, निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे.

कोण करू शकतं अर्ज?बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. अर्जदाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?जनरल आणि ओबीसी कॅटॅगरीतील अर्जदारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागतील. तसेच, अनुसूचित जाती आणि जमाती कॅटॅगरीतील उमेदवारांना अर्ज शुल्क ६०० रुपये आणि दिव्यांग अर्जदारांसाठी ४०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सर्व कॅटॅगरीतील अर्जदारांना जीएसटी शुल्क देखील भरावे लागणार आहे.

कसा करावा अर्ज?- बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.- होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा.- यानंतर आता Current Opportunities वर क्लिक करा.- अप्रेंटिस अप्लायच्या लिंकवर क्लिक करा.- यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा.- तसेच, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि जे काही शुक्ल असेल, ते भरून फॉर्म सबमिट करा. 

कशी राहील निवड?अप्रेंटिस पदासाठी अर्जदारांची निवड सीबीटी परीक्षा, भाषा टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे केली जाणार आहे. परीक्षेत सामान्य आणि आर्थिक जागरूकता, हिंदी/इंग्रजी परिमाणात्मक आणि तर्क योग्यता, कॅम्प्युटर ज्ञान आणि सामान्य इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. याशिवाय, अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेने जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.

टॅग्स :jobनोकरीbankबँक