शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

१२ दिवसांनंतर चांदी पुन्हा ७० हजारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 10:03 IST

सोनेही ४८ हजारांच्या पुढे : रुपयाच्या घसरणीचा परिणाम

ठळक मुद्देबाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळता सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, दोन दिवसांपासून या मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात वाढ होऊन १२ दिवसांनंतर चांदी पुन्हा एकदा ७० हजार रुपये प्रतिकिलोच्या पुढे पोहोचली आहे तसेच सोन्याच्याही भावात वाढ होऊन ते ४८ हजारांच्या पुढे गेले आहे. डॉलरचे दर वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळता सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, दोन दिवसांपासून या मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीमध्ये भाववाढ होत राहिली. अनलॉकनंतर  सुवर्णपेढ्या सुरू झाल्या व भाव वाढत जाऊन १० जूनला चांदी ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती. मात्र, ११ रोजी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतर सातत्याने घसरण होत जाऊन १८ जून रोजी ७१ हजार ५०० रुपयांवर आली व १९ रोजी एकाच दिवसात दोन हजाराची घसरण होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. ही घसरण होत जाऊन २८ जून रोजी ६९ हजारांवर आली. \त्यानंतर  जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदी ७० हजारांच्या पुढे जाऊन ७० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. २ जुलैला मात्र त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७०  हजार रुपये प्रतिकिलोवर आली. १९ जूनपूर्वी ७० हजारांच्या पुढे असलेली चांदी या भाववाढीमुळे १२ दिवसांनतर १ जुलैला पुन्हा ७० हजारांच्या पुढे गेली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात वाढ होत जाऊन २ जुलैला सोने ४८ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

डॉलरच्या दरवाढीमुळे गुंतवणूक वाढलीभारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढत असल्याने सोने-चांदीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात ७३ ते ७४  रुपयांवर असलेल्या डॉलरचे दर जुलै महिना सुरू होताच २ जुलै रोजी दर ७४.८० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोने-चांदी वधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Silverचांदीbusinessव्यवसाय