शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

बोलायला घाबरताय? सहा ‘पी’ घेतील तुमची काळजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:01 PM

या सहा गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कधीही, कोणत्याही वेळी तुम्ही ठोकू शकाल अस्खलित भाषण

ठळक मुद्देभाषणाचं थोडं प्लॅनिंग करा, कुठे, किती वेळ बोलायचं आहे, आॅडियन्स कोणता आहे, याचा विचार करा. भाषण करताना काही अपिलिंग उदाहरणं, थोडी विनोदाची पेरणी, आपली बॉडी लॅँग्वेज याकडे लक्ष दिलं तर आपलं भाषण नक्कीच बहारदार होईल.ज्या श्रोत्यांसमोर आपण बोलणार आहोत, त्यांना संभाषणात सहभागी करुन घेता आलं तर भाषण एकसुरी होणार नाही.

- मयूर पठाडेजगातली कुठलीही अवघडातली अवघड गोष्ट तुम्ही मला सांगा, ती मी खात्रीनं करीन, पण भाषण करायला मात्र तुम्ही मला सांगू नका.. ते काही आपल्याला जमत नाही. आपण काम करणारी माणसं. खांद्यावर कितीही काम पडू द्या, मागे हटणार नाही, पण बोलायचं असेल तर मात्र दुसºया कोणाला तरी तुम्ही सांगा...शंभरातले नव्वद टक्के लोकं तुम्हाला हेच सांगतील..पण अगदी प्रत्येक वेळी तडाखेबंद भाषणच तुम्हाला करायचं असतं असं नाही, काही वेळा आपले मुद्दे पटवून द्यायचे असतात, लोकांना समजवून सांगायचं असतं, तर काही वेळी अगदी अचानकही तुमच्यावर भाषण करण्याची जबाबदारी येऊन पडते..पण अशावेळी डगमगून जायचं काहीच कारण नाही. प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य असते आणि भाषणही त्याला अपवाद नाही. सहा ‘पी’ म्हणजे ‘पी’वरुन सुरू होणाºया या सहा गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा.. त्याप्रमाणे थोडी प्रॅक्टिस करा.. तुमच्यातलं भाषणाचं भय आणि बागुलबुवा नक्कीच निघून जाईल.तुम्हाला रोज भाषण करावंच लागतं अशातली गोष्ट नसेलही, पण या सहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा, त्या तुमचा कॉन्फिडन्स कुठल्या कुठे नेऊन ठेवतील.१- प्रॉपर प्लॅनिंग- भाषणाचं थोडं प्लॅनिंग करा, म्हणजे किती वेळ बोलायचं आहे, आॅडियन्स कोणता आहे? आॅफिसमध्ये बोलायचंय, कोणाचा सेन्डॉफ आहे किंवा गल्लीतल्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात थोडं बोलायचं आहे?..२- प्रिपरेशन- भाषणाची अगदी थोडी तयारी केली, तरी तुम्ही सहजपणे वेळ निभावून नेऊ शकाल. त्यासाठी अगदी शब्द न् शब्द पाठ करायची गरज नसते. तसं कधीच करूही नका. मुद्दे तेवढे लक्षात ठेवा. तुमचं ९० टक्के काम झालं म्हणून समजा.३- प्रॅक्टिस. थोडा सराव करा. आरशासमोर उभं राहून बोला. वाटल्यास आपलंच बोलणं रेकॉर्ड करा, त्याचा मोबाइलवर व्हीडीओ काढा. खूप गोष्टी तुमच्या लक्षात येतील.४- प्रोजेक्शन- सादरीकरणाकडे थोडं लक्ष द्या. भाषणात थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या समोरच्या आॅडियन्सला आपला मुद्दा कसा पटवता येईल याचा थोडा विचार करा.५- परफॉर्मन्स- आपल्याला कोणत्या ठिकाणी बोलायचं आहे, फक्त वाचून दाखवायचंय कि एखादा रिपोर्ट सादर करायचाय कि भाषण.. यावरुन त्याची पद्धत बदलेल. भाषण करताना काही अपिलिंग उदाहरणं, मध्येच थोडी विनोदाची पेरणी, आपली बॉडी लॅँग्वेज याकडे लक्ष दिलं तर आपलं भाषण नक्कीच बहारदार होईल.६- पार्टिसिपेशन- ज्या श्रोत्यांसमोर आपण बोलणार आहोत, त्यांना जर संभाषणात सहभागी करुन घेता आलं तर आपलं भाषण एकसुरी होणार नाही. त्यासाठी त्यांचा मूड पाहाणं, मध्येच काही सोपे प्रश्न विचारणं.. अशा क्लृप्त्या करता येतील.