शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 11:53 IST

सूक्ष्म व लघू उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ राबवली जात आहे.

- श्रीकांत जाधव

शहरात राहणाऱ्या आणि नव उद्योगाची स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. शासनाने नवीन आर्थिक धोरणांतर्गत नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघू उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ राबवली जात आहे.

पात्र मालकी घटक ?वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट

अशी करा कागदपत्रांची पूर्तता  जन्म दाखला / वयाचा दाखला शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे   आधार कार्ड / पॅन कार्ड   नियोजित उद्योग / व्यवसाय जागेबाबतचे दस्ताऐवज   जातीचे / विशेष प्रवर्गाचे प्रमाणपत्र   वाहतुकीसाठी परवानगी व वाहन चालविण्याचा परवाना   स्वसांक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र

अर्ज कोण करू शकते?मुंबईत अधिवास असलेले किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे तरुण-तरुणी उमेदवारअनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी वयाची अट शिथिल आहे.ज्यांना १० लाखांवरील प्रकल्प उभारायचे आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता किमान सातवी तर २५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १० वी पास असायला हवी. अर्जदाराने यापूर्वी राज्य तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

प्रकल्पासाठी शासनाचे अनुदान आणि बँकेचे कर्ज?सर्वसाधारण घटकातील पात्र उमेदवाराला केवळ १० टक्के स्व गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर १५ टक्के शासनाकडून अनुदान मिळते आणि बँकेकडून ७५ टक्के कर्ज मिळते.तर अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक यांना केवळ ५ टक्के स्व गुंतवणूक करावी लागते.

अर्ज कसा करावा?मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सर्व प्रक्रिया ऑनलाइन www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावरून केली जाते. अधिक माहितीसाठी उद्योग सह संचालक कार्यालय, विकास सेंटर, सातवा मजला, वसंत सिनेमागृह चेंबूर पूर्व, या ठिकाणी संपर्क साधावा. 

निवड कशी होते?अर्जदाराने अर्ज केल्यानंतर जिल्हा स्तरावरील स्थापित कार्यालय समितीच्या छाननी अंती मान्यता दिली जाते. पात्र प्रस्ताव संबंधित बँकांना शिफारस करण्यात येतात. प्रकल्पाची तपासणी केल्यानंतर बँकाकडून अनुदान वितरित होते. 

किती किमतीचे प्रकल्प उभारता येतात ?  प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु. ५० लाख   सेवा / कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रु. १० लाख. मर्यादा आहे.

टॅग्स :businessव्यवसाय